Home चंद्रपूर विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून पारडगाव येथील आपदग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत

विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून पारडगाव येथील आपदग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत

विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून पारडगाव येथील आपदग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- ब्रम्हपूरी तालुक्यातील पारडगाव येथील रुपेश निलकंठ मेश्राम वय 38 वर्ष हे मालडोंगरी येथे झाड तोडायला मजुरीवर गेले होते. त्याठिकाणी ते झाडावरून खाली पडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला.
पारडगाव येथील श्रीकृष्ण जनार्धन नाकतोडे वय 45 वर्ष ह्यांना न्युमोनिया आजार होऊन त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतकांच्या पश्चात लहान मूले व पत्नी आहे. ह्या दोघांच्याही मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे. परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना त्यांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे पारडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बांधकामाच्या भुमीपुजनासाठी आले असतांना ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी सदर आपदग्रस्त कुटुंबियांबाबत त्यांना माहिती दिली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सदर आपदग्रस्त कुटुंबियांची आस्थेने विचारपूस करीत आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत देत आधार दिला. व सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे मी व माझे कार्यकर्ते उभे राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादाजी ढोरे, सरपंच पिंटु पिल्लेवान, मनीष गीरी, मंगल पारधी, देवनंदन ठेंगरी, दिपक मेश्राम, निलेश राऊत, रुपा मेश्राम यांसह अन्य गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here