अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
विसापूर :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा संलग्नीत चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग च्या वतीने स्वच्छ गाव, रस्ता सुरक्षा व मतदार जनजागृती या संकल्पनेवर सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन ग्राम विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर येथील राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर येथे दि. 28 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी 2024 या कालावधीत चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.
दि. 29 डिसेंबर रोजी विशेष वार्षिक शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सात दिवसीय शिबिराचे आयोजन 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. सुभाष, विशेष अतिथी धनंजय साळवे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बल्लारपूर, अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर, डॉ. दिलीप जयस्वाल माजी प्राचार्य राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर, प्राध्यापिका शालिनी जयस्वाल, डॉ. विजया गेडाम चंद्रपूर जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, प्रा. विनायक बोढाले उपप्राचार्य वाणिज्य विभाग, डॉ. एन. आर. बेग आय.क्यू.ए.सी. समन्वयक, प्रा. डॉ. आय. एस. कोंड्रा इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वयंसेवकांना उत्तम असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर बल्की यांनी केले. संचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक प्रतिनिधी विशिता सूर्यवंशी आणि बादल चिवंडे यांनी केले. तर आभार रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.गणेश येरगुडे यांनी केले. यावेळी कार्यक्रम नियोजन रासेयो निकिलेश चामरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक डॉ. ज्योती पायघन, प्राध्यापक रामटेके, रासेयो स्वयंसेवक वसीम शेख, तृप्तेश मसिरकर, आणि इतर स्वेमसेवकांनी विशेष मेहनत घेतली.