Home क्राईम स्टोरी धक्कादायक :- दारूभट्टीची एनओसी मिळविण्यासाठी महिला सरपंचावर अविश्वास ?

धक्कादायक :- दारूभट्टीची एनओसी मिळविण्यासाठी महिला सरपंचावर अविश्वास ?

अवैध देशी दारू विकणाऱ्या अंजू अन्ना यांची रामपूर येथे देशी दारू भट्टीला एनओसी देण्यासाठी साखर वाटप करून ठरावावर सह्या ?

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्रीच्या धंद्यात परप्रांतीयांची मोठी संख्या असुन खांबाडा येथे काही वर्षांपूर्वी आलेला अंजू अन्ना आता अवैध दारू विक्रीतून आकाश बार चा झाला आहे, शिवाय तो तालुक्यातील चार बिअर बार व एक देशी दारूचे दुकान किरायाने चालवीत आहे. त्याला आता हे सुद्धा कमी पडत असुन रामपूर येथे देशी दारूचे दुकान थाटण्यासाठी त्यांनी चक्क फत्तेपूर, रामपूर, पिंपळगाव या तीन गांव मिळून बनलेल्या गटग्रामपंचायतच्या सदस्यांनाच खरेदी करून या गावांतील महिला व पुरुषांना त्यांच्या माध्यमातून दोन दोन किलो साखर वाटप केली व त्यांच्या प्रोसेडिंग रजिस्टर मध्ये सह्या घेतल्या हा गंभीर प्रकार जेंव्हा सरपंच अर्चना कुमरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विरोध केला असता त्या महिला सरपंच विरोधातच अविश्वास प्रस्ताव आणून त्यांचे सरपंच पद घालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आंध्रप्रदेशात वास्तव असलेला अंजू अन्ना यांचे खांबाडा गावात पण मतदार यादीत नाव आहे, दरम्यान त्यांची गुंड टोळी ही खांबाडा परिसरात व त्या भागातून हिंगणघाट समुद्र्पुर तालुक्यात देशी विदेशी विक्रीचा अवैध व्यवसाय करत आहे. या फत्तेपूर गावात काही महिन्यांपूर्वी चार युवकांचा देशी दारू पिण्याच्या नादात मृत्यु झाला होता, या तीन गावचे तरुण युवक दारूच्या आहारी गेल्याने त्यांचा परिवार अगोदरच आर्थिक अडचणीत असतांना अंजू अन्ना यांनी फत्तेपूर येथे देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना काही आर्थिक पैकेज देऊन अगोदर फुकटात साखर वाटप केली व त्या बदल्यात ग्रामपंचायत च्या ठराव बुकात सह्या घेऊन तसा एनओसी चा ठराव तयार केला व त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या महिला सरपंच अर्चना कुमरे यांच्यावर अविश्वास आणला दरम्यान ही बाब उघड झाल्यास त्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांविरोधात मोठी कारवाई होऊ शकते. एखाद्या आर्थिक फायद्यासाठी शासन प्रशासनाची दिशाभूल करणे, गावांतील महिला व पुरुषांना साखरेचे आमिष दाखवून त्यांच्या ठराव बुकावर सह्या घेणे आणि आदिवासी महिला सरपंच यांच्यावर खोट्या पद्धतीने चुकीचे व बनावट आरोप करून त्यांच्यावर अविश्वास आणणे हा मोठा गुन्हा ठरत आहे, त्यामुळे हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून घडलं याचा मास्टरमाईंड कोण आहेत याचा शोध पत्रकार मंडळी घेत आहे.

Previous articleजनता महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे विसापूर येथे उदघाटन
Next articleमा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे बुधवार दि. 03/01/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here