Home भद्रावती संतापजनक:- भद्रावती तहसीलदार सोनवणे हे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी शामकांत थेरे...

संतापजनक:- भद्रावती तहसीलदार सोनवणे हे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी शामकांत थेरे सोबत?

दीड महिना लोटून सुद्धा शामकांत थेरे यांच्यावर फौजदारी आणि दांडात्मक कार्यावही का नाही? तहसीलदार सोनवणे ची नार्को टेस्ट गरजेचे?

चंद्रपूर :-

भद्रावती तालुक्यातील मौजा तिरावंजा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन करून कोट्यावधीचा शासन महसूल बुडविणाऱ्या शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांविरोधात तहसीलदार सोनवणे यांची मैत्री सर्व रेती व्यवसाईकांना माहीत असून त्यांनी स्थानीय मंडळ अधिकारी व तलाठी यांना सुद्धा आपल्या अर्थपूर्ण सहकार्याने जखडून ठेवले आहे, दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी याबाबत विभागीय आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी याच्याकडे तक्रार दाखल केली व शामकांत थेरे यांच्यावर अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची या कामात वापरलेल्या पोकलेनं जेसीबी मशीन व हायवा ट्रक जप्ती करण्याची मागणी केली होती व त्यांना सहकार्य करणाऱ्या तहसीलदार सोनवणे यांच्यावर निलंबणाची व राष्ट्रीय संपत्तीच्या चोरीत सहभागी असल्याचा ठपका ठवून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे, पण अजूनही त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने महसूल प्रशासनाच्या या लुपाच्छूपी धोरणविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे,

भद्रावती तालुक्यातील मौजा तिरावंजा येथे जवळपास एक किलोमीटर जागेत शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांनी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला आहे. या संदर्भात मनसेतर्फे उपविभागीय अधिकारी वरोरा व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी आदेश देऊन त्यांचे मोजमाप करण्याचे निर्देश तहसीलदार सोनवणे यांना दिले होते, दरम्यान नायब तहसीलदार भांदककर, मंडळ अधिकारी वाटेकर, तलाठी अनामिका भगत यांनी मौका चौकशी करून गौण खनिज उत्खनन झाले त्यांचे मोजमाप केले, परंतु जवळपास दीड महिना लोटून गेल्यानंतर सुद्धा तहसीलदार सोनवणे यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या शामकांत थेरे व त्याच्या सहकार्यांवर दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई केली नाही त्यामुळे तहसीलदार सोनवणे हे आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होते, कारणं जे अवैध उत्खनन झाले त्यात तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पैसे घेऊन उत्खनन करण्याची मूक संमती दिली होती हे स्पष्ट दिसतं आहे. दरम्यान कुठलेही अवैध उत्खनन तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संमती शिवाय होत॑ नाही, त्यामुळे त्यांनी शामकांत थेरे व त्यांच्या सहकार्यांन अवैध गौण खनीज उत्खननाची परवानगी दिली होती आणि त्यामुळेच तहसीलदार सोनवणे हे त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही कारणं ते यात सहभागी आहेत हे दिसतं आहे.

तहसील कार्यालयातून ट्रक चोरी प्रकरणाचे काय? तहसीलदार सोनवणेची नार्को टेस्ट?

भद्रावती तहसीलदार सोनवणे हे महाभ्रष्ट अधिकारी असून त्यानी अनेक रेतीचे ट्रक पैसे घेऊन सोडल्याचे उदाहरणे आता समोर येऊ लागले आहे, एका ट्रक ला जप्ती करून नंतर तो कसा सोडला याची रंजक कथा रेती विक्रेत्यामध्ये चर्चील्या जात असतानाच मागील महिन्यात झलेल्या तहसील कार्यालयातून ट्रक चोरीची घटना पुन्हा रंजक बनली आहे, तहसील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तेलंग यांच्या माध्यमातून अवैध रेती वाहतूक दारांकडून पैसे घेणारे तहसीलदार सोनवणे यांनी ट्रक सोडण्यासाठी 60 हजार रुपये घेण्याचे आदेश तेलंग यांना दिले व तेलंग यांनी तो ट्रक तहसील कार्यालयातून ट्रक मालकांच्या स्वाधीन केला पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तहसील कर्मचाऱ्यांनी ट्रक चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली व तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले पण त्यात महत्वाची भूमिका असलेल्या तहसीलदार सोनवणे यांना का सोडले? हा मुख्य प्रश्न असून एखादा ट्रक तहसील कार्यालयातून कुणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडू शकत नाही व तेलंग यांनी पत्रकारांना स्पष्ट सांगितले की मी तहसीलदार सोनवणे यांना 60 हजार रुपये दिले, मग तहसीलदार सोनवणे यांना का सोडले हा गंभीर प्रश्न असून सर्व आरोपीना अजूनपर्यंत जामीन मिळाला नसल्याचे सांगण्यात येत असल्याने तहसीलदार सोनावणे यांची नार्को टेस्ट कारण्याची मागणी पण जोर धरू लागली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here