Home Breaking News सावित्रीमाई ने खुली केली आपल्यासाठी शिक्षणाची दारे : काँग्रेस नेते दिनेश चोखारे

सावित्रीमाई ने खुली केली आपल्यासाठी शिक्षणाची दारे : काँग्रेस नेते दिनेश चोखारे

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  03 जानेवारी 2024 सावित्रीमाई यांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे केली असून सावित्रीमाई यांच्या विचारांवर आधारित आपण समाजात परिवर्तन घडवून आणावे असे काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी सांगितले. जि.प.उच्च प्राथ.शाळा चिचपल्ली येथे आज दि.३ जानेवारी २०२४ रोजी ” क्रांतिज्योती सावित्रीआई फुले “ यांची जयंती ” बालिका दिन ” मोठ्या थाटा-माटात साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेस नेते दिनेश चोखारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान.दिनेशभाऊ चोखारे यांचे शुभ हस्ते मान.चंदन उंचेकर सरपंच, मान.विजय वनकर मु.अ.तथा केंद्रप्रमुख, मान.रवीभाऊ सुत्रपवार सदस्य, मान.दिपकभाऊ रामटेके अध्यक्ष शा.व्य.स.मा.पुष्पा गेडाम सदस्या,मान.प्रसून दुर्योधन, मा.मालाबाई दुर्योधन तथा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीआईंच्या प्रतिमेस दिप प्रज्वलीत करुन माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी दिनेश चोखारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून सांगितले की, सावित्रीमाई यांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे आज महिलांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. सावित्रीमाई यांच्या विचारांवर आधारित आपण समाजात परिवर्तन घडवून आणावे. स्त्री-पुरुष समानतेसाठी आपण प्रयत्न करावेत. त्यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीमाई यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

बालिका दिनाचे औचित्य साधून माजी बांधकाम सभापती मान.दिनेशभाऊ चोखारे यांचे वतीने शाळेतील सर्व मुला-मुलींना नोटबूक तथा बिस्कीट वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय वनकर यांनी केले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मनोगत सादर केले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन कु.सोनाक्षी निमगडे  तर आभार कु.नव्या निमगडे या विद्यार्थीनीनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कु. अर्चना येरणे मॅडम, कु. लीना आवळे मडम, रेवानंद मेश्राम सर, तथागत खोब्रागडे सर,मिनल दोडके, भुजंग रामटेके तथा विद्यार्थ्यांचे मंत्रीमडळांने अथक परिश्रम घेतले.  सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर गिते आणि भाषण दिले. गावातील महिलांची   सुद्धा भाषणे, संगीत खुर्ची, लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आली. जि.प.शाळेच्या विद्यार्थीनीनी सुंदरसे स्वागतगीत गाऊन गाऊन मंत्रमुग्ध केले. आजच्या रंगारंग कार्यक्रमाचे उद्घाटक मान.दिनेशभाऊ चोखारे यांनी शाळेला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक म्याट चटई लवकरच देण्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here