अवैध व्यवसायातून राजकीय पदाधिकाऱ्यांची संघटित गुन्हेगारी वाढल्याने पोलीस प्रशासनावर सर्वासामान्य जनतेचा संताप?
शिवसेना (उबाठा) वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर मुख्य सूत्रधार.
चंद्रपूर :-
शहरात काल रात्री 8.30 च्या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची आरोपी हिमांशू कुमरे यांनी धारदार शस्त्राने पोटात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून रेती, गौण खनिज चोरीसह इतर अनेक गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वाहतूक जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर हे या गुन्ह्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान काल झालेल्या हत्त्येने शहर हादरले असून सर्वासामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होतं आहे. स्वप्नील काशीकर यांच्यावर खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून नुकतेच त्यांच्यावरील गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात ते फरारीवर असताना काल अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता मात्र आता त्यांच्यावर 302 सारखा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर पोलीस कोणती कारवाई करते व कोणती सजा मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, या प्रकरणात आरोपी व ज्याचा खून झाला ते सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.
कधी काळी शांत शहर म्हणून सुविख्यात असलेलं चंद्रपूर शहर आता अवैध व्यवसायातून संघटित गुन्हेगारीला बळ मिळत असल्याने अशांत व धोकादायक शहर म्हणून समोर येत असल्याचं चित्र तयार होतांना दिसत आहे. शहरातील अनेक राजकीय पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी रेती, कोळसा, गौण खनिज व इतर अवैध व्यवसायात भागीदारी तत्वावर सुरु केलेले धंदे व त्यापासून मिळणारी अतोनात रक्कम यामुळे त्यांच्यात निर्माण झालेला अहंकार हा गुंडगिरीला निमंत्रण देत आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यात आपसात झालेला वाद हा युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख असलेल्या शिवा वझरकर यांच्या हत्येचा विषय ठरला आहे. दरम्यान रामनगर पोलिसांनी काही आरोपीना अटक केली असून काही आरोपी फरार असल्याची माहिती आहे, शहरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शांतता राखली जावी याकरिता पकडलेल्या आरोपीना इतर पोलीस स्टेशन मध्ये ठेवल्याची माहिती आहे.
काय आहे या हत्येचं नेमकं कारण?
युवासेना शहर प्रमुख शिवा मिलींद वझरकर वय 25 वर्षे रा. अरविंद नगर चंद्रपूर हा ठेकेदारी करीत होता व तो हिमांशू कुमरे सोबत दोन वर्षाआधी स्वप्नील काशीकर रा. चौरे लेआऊट चंद्रपूर याचेकडे ठेकेदारीचे काम पाहत होता. दरम्यान शिवाने पेमेंट च्या कारणावरुन स्वप्नील काशीकर याचेकडे काम करणे त्याने सोडले होते व दोन वर्षापुर्वी स्वप्नील काशीकर याने बूटेल ईलेक्ट्रा MH-34 1500 ही मोसा शिवा वझरकर याचे नावावर लोनवर विकत घेतली ती मोसा स्वप्नील काशीकर यांनी ताब्यात घेऊन त्याचा वापर करत होता मात्र सदर मो.सा. चे ईएमआय स्वप्नील काशीकर भरत नसल्याने लोन भरण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होत होते. आता स्वप्नील काशीकर आणि हिमाशू कुमरे हे सोबत ठेकेदारीचे काम करतात. शिवाने स्वप्नील काशीकरकडे काम करणे सोडल्यापासून हिमांशु कुमरे, स्वप्नील काशीकर आणि शिवा यांचेमध्ये वाद निर्माण व्हायचे त्यातच काल दिनांक 25/01/2024 रोजी रात्रो 08/00 च्या दरम्यान नेहमीप्रमाणे लॉ कॉलेजचे बाजूला तक्रारकर्ता निलेश हिवराळे, शिवा वझरकर, साहील सिडाम, समिर शेख, नासीर शेख, राज सोपर असे मित्रमंडळी मिळून चर्चा सुरु असतांना हिमांशू कुमरे याचा शिवाच्या मोबाईलवर कॉल आला तेव्हा शिवाने त्याचे मोबाईलचा स्पिकर ऑन केला असता हिमांशू कुमरे हा शिवाला तुझा बाप 300 रुपये रोजीने पोह्याच्या ठेल्यावर काम करते तुझी का औकात आहे असे बोलला त्यानंतर हिमांशू ने शिवाला स्वप्नील काशीकरचे ऑफीस समोर बोलावले. त्यावरुन सर्व मित्र रात्रो 08/20 वा. सर्व मित्र शिवासह स्वप्निल काशीकर याचे अग्रवाल क्लासेस जवळील ऑफीसजवळ गेले. तेव्हा स्वप्नील काशीकर, हिमांशू कमरे, चैतन्य आसकर, रिझवान पठाण, नाझीर खान, रोहीत पितरकर, सुमित दाते, अन्सार खान हे तेथे हजर होते. हिमांशू कुमरे यास वडीलांबद्दल वाईट का बोलला असे विचारले असता तु कौन होते बोलणारा मी अजून बोलतो तु का करते बे असे बोलल्यानंतर स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे, चैतन्य आसकर, रिझवान पठाण, नाझीर खान, रोहीत पितरकर, सुमित दाते, अन्सार खान व ईतर ईसमांनी त्यांना घेरले तेव्हा स्वप्नील काशिकर ने हिमांशू कुमरेला त्याचे ऑफीसमध्ये घेवून गेला आणि त्यानंतर हिमांशू कुमरे एक लोखंडी चाकू घेवून आला व हिमांशूने शिवा वझरकर यांचे पोटावर लोखंडी चाकूने वार केला त्यानंतर समीर शेख याने हिमांशू ला पकडण्याचा प्रयत्न केला असता समिरच्या बोटाला मार लागला. त्यानंतर शिवा खाली जमिनीवर पडला त्याच्या पोटातून रक्त पडू लागले. त्यानंतर हिमांशू व त्याचेसोबतचे ईतर लोकांनी शिवाला लाता मारल्या. त्यानंतर समिर शेख, साहील सिडाम, राज सोपर यांनी शिवा ला उचलून हॉस्पीटला घेवून गेले. यशोधन हॉस्पीटल चंद्रपूर येथे शिवाला भरती केले असता शिवा मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.