Home चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून उद्या रविवारी भव्य विदर्भ राज्यस्तरिय बॉडी बिल्डींग...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून उद्या रविवारी भव्य विदर्भ राज्यस्तरिय बॉडी बिल्डींग स्पर्धा

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

प्रसिध्द बॉडी बिल्डर निलेश दगडे स्पर्धेचे विशेष आकर्षण

चंद्रपूर  :-  आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत उद्या रविवारी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अॅंड फिटनेस स्पोट्र्स असोसिएशन चंद्रपूर यांच्या सहकार्याने चंद्रपूर महानगर पालिका पटांगणावर भव्य विदर्भ राज्यस्तरिय बॉडी बिल्डींग अंजिक्यपद स्पर्धा पार पडणार आहे. मुंबईचे प्रसिध्द बॉडी बिल्डर निलेश दगडे हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे.

यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाला सुरवात करण्यात आली आहे. या अंतर्गत नुकतेच क्रिकेट सामने आणि कबड्डी स्पर्धा घेण्यात आली आहे. तर उद्या रविवारी गांधी चौक येथील महानगरपालिकेच्या पटांगणावर भव्य विदर्भ राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग अंजिक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांयकाळी 5 वाजता या सामान्यांना सुरवात होणार आहे. या स्पर्धेत नामवंत बॉडी बिल्डर सहभागी होणार आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष असून यंदा मुंबईचे प्रसिध्द बॉडी बिल्डर निलेश दगडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या स्पर्धेत आमदार श्री ठरणा-या बॉडी बिल्डरला 51 हजार 111 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तर बेस्ट पोझरसाठी 31 हजार 111 रुपये ट्रॉफी , बेस्ट इम्प्रुव्हसाठी 21 हजर 111 रुपये ट्रॉफी , असे एकुन दोन लक्ष 46 हजार 648 रुपयांचे पारितोषिक वितरित केले जाणार आहे. या स्पर्धेला आमदार किशोर जोरगेवार यांचीही प्रामुख्याने उपस्थिती राहणार असुन नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहण आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here