Home Breaking News वाहनधारकांचा ‘डेटा’ गहाळ ? ‘सारथी’ची यंत्रणा ठप्प; २५ कोटी जणांची माहिती मिळेना

वाहनधारकांचा ‘डेटा’ गहाळ ? ‘सारथी’ची यंत्रणा ठप्प; २५ कोटी जणांची माहिती मिळेना

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

पुणे  :-  केंद्र सरकारच्या ‘सारथी’ संकेतस्थळाच्या ‘सव्र्व्हर’मध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्यामुळे देशातील वाहनचालक परवाने देण्याची प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून ठप्प झाली आहे. ‘सारथी’वर आतापर्यंत काढलेल्या २५ कोटी वाहनचालक परवान्यांची माहिती (डेटा) गहाळ झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’कडून (एनआयसी) बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही यंत्रणा कधी सुरू होणार? याबाबत राज्य व केंद्र सरकारमधील कोणीही स्पष्ट सांगण्यास तयार नाही.

गेल्या आठ दिवसांपासून पुण्यासह देशभरातील विविध ‘आरटीओ’ कार्यालयांतील वाहनचालक परवाना देण्याची यंत्रणा बंद आहे. ‘सारथी’ संकेतस्थळावरून वाहनचालक परवाना काढला जातो. मात्र संकेतस्थळाच्या ‘सव्र्व्हर’मध्ये बिघाड झाला आहे. गहाळ झालेला ‘डेटा’ पुन्हा मिळविण्यासाठी

‘एनआयसी’चे काम सुरू असल्याने ही यंत्रणा बंद ठेवली आहे. वाहनचालक परवाना कधी मिळणार, याचे उत्तर परिवहन आयुक्तांकडेही नाही. राज्याचा परिवहन विभाग यावर अधिक काही बोलण्यास तयार नसल्याने ‘डेटा’ गहाळ झाल्याच्या संशयाला बळ मिळत आहे.

‘एनआयसी’ चे काम सुरू असल्याने ही यंत्रणा बंद ठेवली आहे. वाहनचालक परवाना कधी मिळणार, याचे उत्तर परिवहन आयुक्तांकडेही नाही. राज्याचा परिवहन विभाग यावर अधिक काही बोलण्यास तयार नसल्याने ‘डेटा’ गहाळ झाल्याच्या संशयाला बळ मिळत आहे.

‘सारथी’ची प्रणाली बंद पडल्याने पुण्यासह देशभरात एक फेब्रुवारीपासून एकाही नागरिकाला परवाना मिळाला नाही. राज्यात दररोज १५ हजार शिकाऊ तर, १० हजार पक्के तर, परवान्यांतील दुरुस्ती, दुबार आदी २५ हजार परवान्यांवर काम होते. राज्यात एकूण ५० हजार परवाने रोज दिले जातात. “यंत्रणेतील बिघाडाचा फटका नागरिकांना बसत आहे,” असे ड्रायव्हिंग स्कूल चालक विठ्ठल मेहता यांनी सांगितले.

विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.

‘सारथी’मध्ये निर्माण झालेला बिघाड हा देशपातळीवरचा आहे.  कोणत्या कारणांमुळे बिघाड झाला आहे. हे मला सांगता येणार नाही. बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र यंत्रणा कधी पूर्ववत होईल हे निश्चित सांगता येणार नाही.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here