Home चंद्रपूर रनमोचन येथील भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

रनमोचन येथील भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

रनमोचन येथील भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-ब्रम्हपुरी तालुक्यातील रनमोचन गावातील उदासी समाजातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संदिपभाऊ गड्डमवार, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, जेष्ठ काँग्रेस नेते नानाजी तुपट, काँग्रेस जिल्हा सचिव विलास विखार, सुधाकर पोपटे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विकासपुरुष विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून रनमोचन गावातील उदासी समाजातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 10 एप्रिल 2024 रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामधे अनोज बाल, प्रतीग संगतसाहेब, उमेश महासाहेब, मोतीदास संगतसाहेब, मोहन संगतसाहेब, उमेश अलमस्त, जैरामदास अलमस्त, प्रितमदास संगतसाहेब, छबीरदास संगतसाहेब या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
देशात सुरू असलेल्या भाजपच्या दमनकारी नीतीला भारतीय जनता त्रासली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यां अशा कोणत्याच समस्या मोदी सरकार सोडवू शकली नाही. उलट देशात अराजकता माजली आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार चांगले होते. जननायक राहुल गांधी यांचे नेतृत्व व विकास पुरुष विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकास कामाचा झंजावात पाहून ब्रह्मपुरी तालुक्यातील युवा वर्गाचा कल काँग्रेस पक्षाकडे वाढलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here