Home वरोरा संतापजनक :- सदावर्ते च्या कामचोरपणामुळे माढेळी सर्कल मधील निलजई आमडी गाव अंधारात?

संतापजनक :- सदावर्ते च्या कामचोरपणामुळे माढेळी सर्कल मधील निलजई आमडी गाव अंधारात?

वीज ग्राहकांचे फोन उचलत नसल्याने संताप, महावितरण कंपनीच्या शाखा अभियंत्याला मिळणार चोप?

माढेळी (मोहित हिवरकर) :-

सध्या सुरु असलेली उष्णता म्हातारे व लहान मुलांना जिवघेणी ठरत असतांना वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून वीज ग्राहकांना दिवसरात्र नियमित वीज पुरवठा करणे आवश्यक आहे पण माढेळी सर्कल मधील शाखा अभियंता सदावर्ते च्या कामचोरपणामुळे माढेळी सर्कल मधील निलजई आमडी हे गाव अंधारात राहत असल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे, दरम्यान वीज वितरण कंपनीच्या इंजिनिअर सदावर्ते यांना मोबाईल वरून वीज बंद असल्याबाबत तक्रार नोंद करायला वीज ग्राहकांनी फोन केला तर एक तर ते फोन उचलत नाही तर कधी ते मोबाईल स्विच ऑफ करतात त्यामुळे सदावर्ते यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठठांकडे करण्यात येत आहे. विशेषता मागील आठवडा पासून विजेचा लपंडावं सुरु असल्याने निलजई व आमडी गावातील लोकांना रात्रभर अंधारात राहून झोपायला मिळत नसल्याची परिस्थिती काही गावकरी बोलून दाखवत आहे.तर रात्रीला मेनबत्ती लावून राहावे लागतं आहे, दरम्यान त्यामुळे वीज ग्राहकांचा मोठा रोष व संताप बघून ते कधी अभियंत्याला चोप देतील याचा नेम नसल्याची परिस्थिती आहे.

एकीकडे उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा पारा 45 डिग्री पेक्षा जास्त गेल्यामुळे सर्वसामान्य गावखेड्यातील लोकं घरात कुलर पंखे याचा आश्रय घेऊन कसा तरी दिवस काढतात तर रात्री ला याचं वाढलेल्या उष्णतेचा प्रभाव कमी होतं असला तरी मंद हवा आणि मच्छर चा प्रभाव राहिल्याने पंखा किंव्हा कुलर हवाच अशी परिस्थिती असतांना वीज वितरण कंपनीच्या स्थानीय शाखा अभियंता व त्याच्या अधीनस्त कर्मचारी यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने विजेचा लपंडाव यामुळे गावखेड्यात कधी कधी रात्रभर जागे राहण्याची वेळ येत असल्याचा संतापजनक प्रकार समोर येतांना दिसत आहे. आता या संदर्भात गावकरी संतापून असून सदावर्ते यांच्यावर कार्यवाहीची मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here