Home Breaking News अंबुजा फाउंडेशन, उपरवाही उत्तम कापूस प्रकल्पा अंतर्गत सुमठाण्यात्त शेतमजुर शौचालय…

अंबुजा फाउंडेशन, उपरवाही उत्तम कापूस प्रकल्पा अंतर्गत सुमठाण्यात्त शेतमजुर शौचालय…

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  अंबुजा फाउंडेशन, उपरवाही उत्तम कापूस प्रकल्पा अंतर्गत रजनी खानोरकर यांच्या मार्गदशनाखाली सुमठाना या गावी शेतकरी श्री. विठ्ठल उमरे व सौ. प्रांजली उमरे यांच्या शेतात शेतमजूर शौचालय बांधण्यात आले .

शेतात येणारे महिला पुरुष मजूर यांना सौच्यास जाण्यास अडचणी होतात. त्याचप्रमाणे त्यांची सुरक्षा हेतू व एक उत्तम काम म्हणून शेतामध्ये शेतमजूर शौचालय बांधून आज त्याचे उत्तम उदाहरण शेतकरी यांनी सुमठाणा गावाची यांना शिकवण दिली शेतमजूर शौचालय सोबत महिलांना मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड व हँडवॉश करण्यासाठी साबुन याची देखील व्यवस्था शेतमजूर शौचालयास मध्ये ठेवण्यात आली.

महिला उघड्यावर किंवा धुरा बांधावर शौचास जाण्यास अडचणी निर्माण होतात व महिला वेळ काढून किंवा उशिरा शौचास झाल्याने महिलांमध्ये अनेक आजारांचा सामना होताना दिसतात त्याच अनुषंगाने एक उत्तम काम म्हणून महिलांसाठी व पुरुषांसाठी एकूणच शेतात येणाऱ्या शेतमजूर सर्वांसाठी शौचालयाची निर्मिती करण्यात आली.

या उपक्रमाला उपस्थित शेतकरी महिला शेतकरी व पुरुष शेतकरी तसेच गावातील उपस्थित- उपसरपंच सौ. अनुताई प्रमोद ताकसांडे व मुक्ताई गटातील सर्व तेराही सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी गणपत बल्की , नीलकंठ बोबडे, विनोद देवतळे, प्र. अ. रजनी खानोरकर, हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here