Home Breaking News बाबुपेठ, रेल्वे उडानपुलीयाचे बांधकाम तात्काळ करण्याचे पाझारे यांचे सा.बां. वि. ला निवेदन…

बाबुपेठ, रेल्वे उडानपुलीयाचे बांधकाम तात्काळ करण्याचे पाझारे यांचे सा.बां. वि. ला निवेदन…

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

नागरिकांची होणारी गैरसोय टाळावे  : ब्रिजभूषण पाझारे

चंद्रपूर  :-  मागील काही वर्षापासून धीम्या गतीने सुरु असलेल्या बाबूपेठ रेल्वे उडान पुलीयाच्या बांधकामामुळे त्या मार्गाने रहदारी करणाऱ्या नागरिकांना खूप हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. तसेच आता पावसाळा सुरू होत आहे, व सोबतस लाहान मुलांनाच्या शाळा व कॉलेज सुद्धा चालू होत आहे,

इतकेच नाही तर येथील कामगारांना व ऑफिस जाणाऱ्या नागरिकांना या कासव गतीच्या रेल्वे उडान पुलांच्या कामामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांना होत असलेली समस्याला त्रासून येथील नागरिकांनी महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांच्या समोर होणाऱ्या त्रासाची गाथा मांडली.

त्यांनी पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात संबंधित रेल्वे उडान पुलाच्या बांधकामाचा आढवा घेऊन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग-२, चंद्रपूर यांना निवेदन दिले.व सदर उडान पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here