Home Breaking News चंद्रपूर जिमस बँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश निखाडे यांची निवड…

चंद्रपूर जिमस बँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश निखाडे यांची निवड…

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटना र. न. ४५२४ या संघटनेची सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये नविन कार्यकारणीची निवड करण्यांत आली. यात संघटनेचे अध्यक्षपदावर श्री. सुरेश उर्फ बाळु निखाडे, कार्याध्यक्ष शैलेश दोरखंडे, उपाध्यक्ष गणेश उलमाले, जनरल सेक्रेटरी आनंद मेश्राम, कोषाध्यक्ष अतुल चौधरी, सचिव अनिल गावंडे व अनिल राठोड, जिल्हा संघटक सुरज नरेडडीवार व अशोक जाधव यांची निवड करण्यांत आली.

मा. कामगार आयुक्त नागपूर यांनी संघटनेच्या नविन कार्यकारणीला मान्यता दिल्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुरेश निखाडे व कार्यकारणी सदस्य यांनी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. संतोषसिंह रावत व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. राजेश्वर बी. कल्याणकर यांची दि.०१.०७.२०२४ रोजी भेट घेउन त्यांना नबिन कार्यकारणीची माहीती दिली यावेळी श्री संतोषसिंह रावत अध्यक्ष महोदय व कल्याणकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नविन कार्यकारणीचे अभिनंदन केले

व मागील ३ वर्षात बँकेची लक्षणीय प्रगती झालेली असून बँकेला अजुन प्रगतीपथावर नेण्याकरीता सर्वानी प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त करून संघटनेचे अध्यक्ष सुरेश निखाडे व कार्यकारणीला पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश निखाडे व कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here