विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे हिरापूर येथे आर्थिक मदत
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
सावली :- तालुक्यातील मौजा.हिरापूर येथे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सरपंच सौ.प्रीतीताई नितीन गोहने व उपसरपंच श्री.शरद कन्नाके यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.हिरापूर येथील सौ.विमल यादव बाबनवाडे वय ५५ वर्षे हे भूमिहीन शेतमजूर महिला आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले,घरातील प्रमुख व्यक्तीवर अशी वेळ आल्याने कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली, त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना ग्रामपंचायत सदस्या सौ.निता मुनघाटे,सौ.सरिता भोयर,गावातील प्रतिष्टीत नागरिक मा.विलासभाऊ आत्राम,मा.रघुराज सेडमाके ,मा.नत्थूजि सेडमाके ,मा.अरविंद कुंभरे,मा.रंजित कन्नाके,मा.नामदेव कुंभरे,मा.रामदास नागापुरे आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.