Home चंद्रपूर क्राईम :- राजुऱ्यातील त्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपी तर बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब...

क्राईम :- राजुऱ्यातील त्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपी तर बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब चे दोन गँगस्टरला अटक

स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी, राजुरा येथील त्या निरापराध महिलेच्या हत्तेचा बदला?

राजुरा /बल्लारपूर :-

जिल्ह्यात क्राईम ग्राफ वाढला असतांना पुन्हा राजुरा येथे शिवज्योतसिंह देवल (२८) यांच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करणाण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती व पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले होते, दरम्यान या घटनेची जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपअधीक्षक रीना जनबंधु यांनी गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, राजुरा पोलिस ठाणे व राजुरा उपविभागीय अधिकारी अशी पथके गठित करून आरोपी चा शोध सुरू केला, या प्रकरणी अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेने लल्ली शेरगील व शगीर उर्फ मोणू कादीर शेख या दोन आरोपींना मंगळवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास अटक केली. तर बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणात देखील जबलपूर येथून दोन गँगस्टरला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे .

सतत घडत असलेल्या गुन्हेगारीने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतांना स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी अटक केली तर बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणात देखील जबलपूर येथून दोन गँगस्टरला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी हे जबलपूर येथील कुख्यात गँगस्टर असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

राजुरा पंचायत समिती समोरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम समोर शिवज्योत सिंह देवल याच्यावर गोळीबार करून हत्या केली होती. या हत्येच्या पूर्वी लल्ली शेरगील याच्यावर सोमनाथ पुरा येथे हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावून शोध घेतला व गोळीबार करून फरार झालेले लल्ली शेरगील व शगिर उर्फ मोनु कादीर शेख हे दोघे जिल्ह्यातून फरार होण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पोलिसांनी अटक केली. चार तासात या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा गोळीबार नेमका का केला याचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी राजुरा येथे एका असाच एक गोळीबार झाला होता मात्र आपसातील दुश्मनी चा शिकार एक महिला झाली आणि चुकून गोळी तिला लागली आणि त्या निरापराध महिलेचा जीव गेला त्याची जणू आता परतफेड झाली का? हा प्रश्न पोलिसांसमोर असून मागील घटनेचा आरोपी असलेल्या व्यक्तीचा मृतक हा भाऊ असलाचे बोलल्या जात असल्याने हा गोळीबार बदला घेण्यासाठी करण्यात आल्याची माहिती आहे.

बल्लारपूर येथे ७ जुलै रोजी मालू यांच्या कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला होता. हल्ला करून आरोपी पळून गेले होते. या घटनेबाबत पोलीस स्टेशन बल्लारपुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारशा पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जबलपूर राज्य मध्यप्रदेश येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here