मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन व दिल्या शुभेच्छा.
नाशिक :-
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनचे जाळे संपूर्ण देशात पसरले असून पोलिसांच्या मदतीने सर्वसामान्य जनतेच्या हक्क अधिकाराच्या लढ्याला चालना देणारे पोलीस मित्र हे आधारस्तंभ व्हावे या दृष्टीने संघटनेची वाटचाल सुरु आहे, दरम्यान नाशिक शहराचे मनसेचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते मयूर कुकडे यांची नुकतीच या संघटनेच्या नाशिक शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, यांची निवड पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार व कामगार नेते गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांनी केलेल्या सुचनेनुसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलभाऊ पाटील यांच्या सहमतीने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उमेदभाऊ सुतार यांच्या वतीने करण्यात आली.
नाशिक शहरात या संघटनेचे सभासद नोंदणी अभियान राबवून संघटनेला बळकटी देण्याचे कार्य आपण करू असे वक्तव्य नवनियुक्त शहर अध्यक्ष मयूर कुकडे केले, मयूर कुकडे यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सोबतच अनेक सामाजिक संघटना मध्ये केलेल्या कामामुळे त्यांना संघटनेचे नाशिक शहराध्य पद देण्यात आल्याने पोलीस व नागरिकांना यामुळे निश्चितपणे होईल असा संघटनेचा ठाम विश्वास आहे. मयूर कुकडे यांच्या निवडीचे शहरातील अनेकांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.नाशिक रोड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशोक गिरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ति पत्र देण्यात आले, यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष रमेश गोसावी ,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष विल्सन साळवी ,नाशिक जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी संगीताताई शिंदे,नाशिक जिल्हा सभासद सरला मैडम,सविता भोसले मैडम, वंदना मैडम, अक्षय शिंदे उपस्थित होते.