Home Breaking News मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर येथील रामसेतू पुलिया जवळील जगन्नाथ बाबा मंदिर रस्तातील खड्डे आणि भेगा बनले अपघाताचे कारण….

चंद्रपूर  :-  महापालिकेने बांधलेल्या जगन्नाथ बाबा मंदिराजवळील रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे की, ते रोजचे अपघाताचे ठिकाण बनले आहे. नुकतेच बांधण्यात आले असूनही या रस्त्यावर खड्डे आणि भेगां निर्माण झाले असून, त्यामुळे नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

कंत्राटदारांना दर्जाशी तडजोड करण्याची मुभा देत पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या योग्य देखरेखीशिवाय हा रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे रस्ता खचू लागला असून, खड्डे आणि भेगा अपघाताचे कारण बनले आहे,

आता सध्या लहान मोठा अपघात होत आहे परंतु मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे,

आता पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी दुर्लक्ष देणार की या सिमेंट काँक्रीट रोडाचे लवकरात लवकर निवारण करण्यात येईल या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे, रस्त्याची दुरवस्था चिंतेची बाब बनली असून, पुढील अपघात टाळण्यासाठी तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here