Home चंद्रपूर संतापजनक :- सीएसटीपीएसचे उपमुख्य अभियंता यांच्या बंगल्यावर हिराईचे सामान?

संतापजनक :- सीएसटीपीएसचे उपमुख्य अभियंता यांच्या बंगल्यावर हिराईचे सामान?

हिराई विश्रामगृहाच्या देखरेखीच्या बदल्यात मोफत जेवण व सामान पण फ्री? उच्चस्तरीय चौकशीची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन (cstps) मधील उपमुख्य अभियंता ज्यांच्याकडे हिराई विश्रामगृहाचा कारभार आहे त्यांनी येथे एक वर्षांपासून पदभार सांभाळल्या नंतर जणू हिराई रेस्ट हाऊस स्वतःच्या मालकीचे असल्याचा प्रकार चालवला असल्याची चर्चा असून या हिराई रेस्ट हाऊस मधील सामान आपल्या बंगल्यावर नेल्याचा संतापजनक प्रकार झाला असल्याचे बोलल्या जातं आहे, दरम्यान या हिराई विश्रामगृहात रोजचे मोफत जेवण, मोफत राहणे अश्या प्रकारची दिनचर्या त्यांच्या कडून राबविण्यात आली असतांना त्याकडे मुख्य अभियंता यांचे दुर्लक्ष झाल्याने मोफत योजनेचा विस्तार व्हायला लागला असल्याचे दिसत आहे.

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये गेल्या वर्षभरापूर्वी आलेले उपमुख्य अभियंता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हिराई विश्रामगृहाचा ताबा घेत तिथेच आपला विश्राम ठोकला. नंतर परिवार आला आणि त्यांनी स्वतःच्या बंगल्यात हिराई रेस्ट हाऊस चे किंमती सामान नेले असल्याची ओरड सुरु आहे, दरम्यान सीएसटीपीएस मधील या हिराई रेस्ट हाऊस मध्ये मोफत अन्न, मोफत निवारा याचा लाभ घेत तिन ते चार महीने घालविले व डॉ असलेले उपमुख्य अभियंता यांनी परीवाराला बंगल्यावर आणल्यानंतर हिराई विश्रामगृहाचे सोपा व इतर उपयोगी वस्तू आपल्या बंगल्यावर आणण्यासाठी कुणालाही विचारले नाहीं, कारण त्यांच्यासमोर बोलणार कोण? राजा बोले दाढी हाले या प्रमाणे मी जे म्हणणार ते करावेच लागेल अशा तोऱ्यात ते वावरत आहे आणि मुख्य अभियंताला विचारायची गरज नाही असे म्हणत त्यांनी आपल्या कडे या कंपनीच्या रेस्ट हाऊस चा पूर्ण कारभार असल्याचे दर्शवून मनमानी कारभार चालवला आहे.

दरम्यान या उपमुख्य अभियंताने कामगारांचे गेट पास देण्याचे काम आपल्याकडे खेचून आणले आहे. आपल्या अधिनिस्त असलेल्या कंत्राटदरांच्या कामगारांना स्वतःच्या बंगल्यातील कामे करण्यासाठी कामे करून घेतात. कंत्राटदारांनी कामगार पाठविले नाही तर बिले रोखून ठेवण्याची धमकी देतात या त्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक कंत्राटदारांनी मुख्य अभियंता यांचे कडे आपली गाऱ्हाणी मांडल्याचे ऐकिंवात आहे. दरम्यान दररोज हिराई विश्रामगृहाचे जेवणच चांगले म्हणत पत्नीचाही हिराई विश्रामगृहाचे जेवणासाठी हट्टाहास असल्याचे समजते. उच्चशिक्षीत पत्नीचाही कंत्राटदारांच्या सुपरवायजर यांना फोन करून घरकाम करण्यासाठी कामगार पाठवा अन्यथा साहेबांना सांगून काम थांबविण्याची धमकी देत असल्याची पण चर्चा आहे. या सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी करणे गरजे आहे अन्यथा अशा उपमुख्य अभियंत्याची मोनोपल्ली वाढेल असे एका कंत्राटदाराने आपली आपबीती सांगताना भावना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here