Home वरोरा अभिनंदनीय :- वरोरा नगरपरिषद चे माजी सभापती छोटूभाई शेख यांना यावर्षीचा “जनसेवक”...

अभिनंदनीय :- वरोरा नगरपरिषद चे माजी सभापती छोटूभाई शेख यांना यावर्षीचा “जनसेवक” पुरस्कार

सह्याद्रीचा राखणदार या वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनी वने- मत्स्य व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार?

वरोरा :-

केवळ वरोरा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात सह्याद्रीचा राखणदार “या वृत्तपत्राचा विस्तार झाला असून त्या वृत्तपत्राच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्याचे वने- मत्स्य व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शेख जैरुदीन छोटू भाई माजी सभापती बांधकाम व शिक्षण पाणीपुरवठा आरोग्य विभाग वरोरा यांना जनसेवक पुरस्कार 2024 ने” सन्मानित करण्यात आले, यावेळी मंचावर उपस्थित शिवसेनेचे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, मुख्य संपादक संपादक घुमेजी, टेंमुर्डे वसंतराव विधाते, डॉक्टर घुमे, संपादक आशिष भूमी व इतर मान्यवर उपस्थित होते.

छोटू भाई शेख हे मागील पंचवीस वर्षापासून वरोरा शहर तालुका व जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर गोरगरीब, कामगार व जनसामान्य व्यक्तींच्या समस्या निवारण करण्याकरिता व त्यांना त्यांचा अधिकार मिळण्याकरिता अनेक आंदोलन करीत असून ते सतत पाठपुरावा करून अनेक प्रश्नांना वाचा फोडत आहे, यापूर्वी सुद्धा अनेक संस्था व संघटनेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे, त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मोमेन्टो देऊन जनसेवक पुरस्काराने सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री यांनी सन्मानित केले यावेळी अनेक संघटनाचे प्रतिनिधी व पत्रकार मंडळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here