Home महाराष्ट्र म.रा.मराठी पत्रकार संघाचे मुख्य मंत्रालय प़मुख पदी नितीन जाधव यांची नियुक्ती.

म.रा.मराठी पत्रकार संघाचे मुख्य मंत्रालय प़मुख पदी नितीन जाधव यांची नियुक्ती.

 व्यक्ती विशेष !

राज्य अध्यक्ष यांचे हस्ते सत्कार ! 

पुणे प्रतिनिधी :-

दैनिक.पुढारी चे पत्रकार व सध्या मंत्रालयात अल्पसंख्यांक ,कौशल्य व उद्योजकता विकास आस्थापनेवर कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी नितीन जाधव यांची राज्य पत्रकार संघाचे मुख्य
मंत्रालय संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतीच पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य पदाधिकारी, जिल्हा अ्ध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांचे सभेत नितीन राऊत यांचा राज्य अध्यक्ष वसंत मुंडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
दै.पुढारी मध्ये पञकार म्हणून काय॔रत असलेले जाधव विज्ञान पदवीधर असुन व्यवस्थापनशास्ञ विषयात उच्चपदवीधर आहेत. संगणकशास्ञाचे कौशल्य, वृत्तपत्र विद्या पदवी संपादन केलेले नितीन जाधव विविध विषयात पारंगत असल्यामुळे अनेक व्यासपीठावर भाषणकार,सुञसंचालक ,व्याख्याता म्हणून कामाची ओळख आहे. उद्योग सल्लागार ,राजकीय रणनितीकार,कंपनी व्यवस्थापन ,सामाजिक प्रबोधन्मात्मक मार्गदर्शक असलेलेे नितीन जाधव यांचे पुणे परिसरात राजकीय सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,आर्थिक ,क्रीडा विषयांचे बातमीपञ गाजले आहेत. त्यांच्या या कार्याची शासन दरबारी विशेष नोंद घेतली गेली आहे. संघटनेत तालुका अध्यक्ष ते मंत्रालयात  संपर्क प्रमुख हा प़वास अनेक संघटनात्मक उपक़मातून
सजला असून संघटनेच्या विविध कार्यात नेहमीच तेआघाडीवर राहिले आहेत. संघटनेचे राज्य संघटक मार्गदर्शक संजयजी भोकरे,नुतन प्रदेशाध्याक्ष वसंतराव मुंडे ,सरचिटणीस विश्वासराव आरोटे ,प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव ,विभागप्रमुख ,पदाधिकार्यांनी संघटनेच्या पुणे येथिल सभेत मंञालय मुख्य संपर्क प्रमुख पदी नितीन जाधव यांच्या निवडी बद्दल त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्यात.
येणाऱ्या काळात मंञालयात पञकारांचे ,जनसामान्यांचे न्यायीक विषय सरकार दरबारी मांडणे , संघातील ग्रामीण पञकारांच्या निवासाची सोय व्हावी या साठी मुख्यमंत्री यांचे कडे मागणी रेटण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

Previous articleधक्कादायक :-धारीवाल कंपनीमधील जनक राणे नावाच्या कामगाराचे प्रेतच केले गायब? आकस्मिक अपघाताची नोंद,
Next articleधक्कादायक :-अखेर कैलास अग्रवाल सह इतर कोळसा माफियांना जामीन,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here