Home Breaking News चंद्रपूर: एकाच वेळी दोन नोकऱ्या करणार्‍या मुख्याध्यापकावर कारवाईचे आदेश

चंद्रपूर: एकाच वेळी दोन नोकऱ्या करणार्‍या मुख्याध्यापकावर कारवाईचे आदेश

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर: एकाच वेळी दोन नोकऱ्या करणार्‍या मुख्याध्यापकावर कारवाईचे आदेश

चंद्रपूर  :-  कोरपना तालुक्यातील नांदा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव अनिल मुसळे यांनी एकाच वेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक आणि शाळेत मुख्याध्यापक अशी दोन नोकऱ्या करून शासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सात दिवसांत मुसळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

News reporter :- अतुल दिघाडे

चौकशीत उघडकीस आले आहे की, मुसळे यांनी खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून शाळेत मुख्याध्यापक पद मिळवले. बोगस नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने याबाबत तपास सुरू केला असून, मुसळे यांची नियुक्ती रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अनिल मुसळे यांची मुख्याध्यापक पदावरील नियुक्ती अवैध असल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यांनी २०१० मध्ये बँकेला राजीनामा दिल्यानंतरही १५ महिने बँकेत वेतन उचलले. त्यामुळे मुसळे यांनी बोगस दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात शिक्षण विभागाचे अधिकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून कार्यवाही करतात, पण नांदा येथील संस्थेने वेळोवेळी शासनाची दिशाभूल केली आहे. याप्रकरणी संपूर्ण संचालक मंडळावर कारवाईची मागणी केली जात आहे.

अहवालानुसार, बोगस अनुभव प्रमाणपत्रांच्या आधारे मुसळे यांनी मुख्याध्यापक पद मिळवले. याच संस्थेतील काही शिक्षकांच्या बोगस भरतीप्रकरणीही पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेतील पदभरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरणावर शिक्षण विभागाचे लक्ष लागले असून, दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here