उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांचे प्रतिपादन!
प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-
नागरिक आणि पोलिस यांच्यात समन्वय असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावर यांनी सामाजिक हित साधण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केलेत, आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग, जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने कोरपणा तालुक्यातील कोंडशी येथे पोलिस प्रशासनाच्या पुढाकारातून जन जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मेळाव्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य विनाताई मालेकर प्रमुख पाहुणे विलास यामावार, मडावी सर, ठाणेदार अरूण गुरनुले, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराव बोरडे, डाँ मोहितकर पांडुरंग जरिले, पद्माकर मोहितकर, मनोज गोरे, अनिल कवराशे, सरपंचगिरीजा बाई केराम इत्यादींची उपस्थिती होती. मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांच्या हस्ते करण्यात आले, यामधे उपस्थित पोलिस निरीक्षक गुरनुले पुढे म्हणाले की शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा त्याचप्रमाणे पोलीस सहकार्याचा उपयोग करून समाजातील बुवाबाजी अंधश्रद्धा यांना बळी पडू नयेत तसेच नियमाचे किंवा कायद्याचे उल्लंघन न करता सामाजिक हित जोपासण्याचे काम नागरिकांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, ठाणेदार गुरनुले म्हणाले की कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य मिळवून देण्याकरिता शासकीय योजनांची माहिती मिळवून देण्याकरिता जनजागरण मेळावा हे उत्तम माध्यम आहेत नागरिक व पोलिस यांच्यामध्ये समन्वय साधण्याकरिता मेळाव्याची गरज असून सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरणारा उत्तम माध्यम आहेत मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ व घ्यावा विविध योजनांची माहिती घेतली सांस्कृतिक न्यूथ कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते चिमुकल्यांनी उपस्थित व्यक्ती चे मंत्रमुग्ध केले
कार्यक्रमाला मुख्य आयोजक ठाणेदार, वैद्यकीय अधिकारी अधिकारी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कृषी अधिकारी यांनी केले या प्रसंगी पोलीस पाटील संघटना पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी नागरिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले संचालन विजय मसे यांनी केले तर आभार हेमंत धवणे यांनी मानले