Home कोरपणा बोरी नवेगाव येथे महिला दिन उत्सवाचे यशस्वी आयोजन ! 

बोरी नवेगाव येथे महिला दिन उत्सवाचे यशस्वी आयोजन ! 

गावात निघाली महिलांची प्रभातफेरी !  

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :

बोरी नवेगाव येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी भवनात करण्यात आले. या कार्यक्रमाला आसन बुद्रुक येतील पर्यवेक्षिका मडावी अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य रंजना आत्राम व शंकर तडस, आशा वर्कर सुलोचना शेंडे, अंगणवाडी सेविका सविता वाघमारे, आणि बचत गटाच्या अध्यक्षा होत्या. आसन खुर्द, आसन बुद्रुक, मायकलपूर येथील बचत गटांच्या महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
सकाळी गावातून भजनाने प्रभात फेरी काढण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. महिलांच्या वतीने संपूर्ण गावकऱ्यांकरिता भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील पदवीधर झालेल्या पूजा रागीट हिचा सत्कार महिलांच्या वतीने करण्यात आला. अनेक महिलांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन बचत गट पर्यवेक्षिका कल्पना अवताडे, तर आभार प्रदर्शन अंगणवाडी मदतनीस म्हणून नुकत्याच निवड झालेल्या सविता पंधरे यांनी केले. कार्यक्रम आयोजनाकरिता संपूर्ण ग्रामवासीयांनी सहकार्य केले.

Previous articleक्राईम :-चंद्रपूर विधी महाविद्यालयाच्या परिसरात मानवी अर्ध तुटलेला पाय सापडला
Next articleधोकादायक :-जगभरात धूमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता भारतामधे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here