नवीन वर्षात ग्राहकांना दिलासा: गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
चंद्रपूर :- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात जाहीर केली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांसह इतर व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
व्यावसायिक गॅस सिलिंडर 47.50 रुपयांनी स्वस्त
1 जानेवारीपासून 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 47.50 रुपयांची घट झाली आहे. यामुळे अनेक व्यवसायांना फायदा होईल, विशेषतः हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स साठी ही मोठी दिलासाची बातमी ठरली आहे.
सिलिंडरचे नवे दर:
व्यावसायिक गॅस सिलिंडर:
• दिल्ली: ₹1780
• मुंबई: ₹1740
• चेन्नई: ₹1866
• कोलकाता: ₹1851
घरगुती गॅस सिलिंडर:
• दिल्ली: ₹760
• कोलकाता: ₹790
• मुंबई: ₹785.50
• चेन्नई: ₹818.50
मागील काही महिन्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ झाली होती. मात्र, या ताज्या कपातीमुळे ग्राहकांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.