भटक्या पारधी समाजातील बालकांचे यशस्वी लसीकरण
मनपा आरोग्य विभागाच्या चिकाटीला यश
– गैरसमज दूर करत आरोग्य सेवांचा विस्तार
चंद्रपूर | 22 जुलै :- शिवमंदिर परिसरातील अष्टभुजा वार्डात काही काळासाठी वास्तव्यास असलेल्या भटक्या पारधी समाजातील लसीकरणापासून वंचित बालकांचे अखेर यशस्वी लसीकरण करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनामुळे ही महत्त्वाची मोहीम शक्य झाली.
या समाजामध्ये लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज व भीती होती, जसे की “लस घेतल्यावर बाळ आजारी पडते”, यामुळे अनेक कुटुंबांनी लसीकरण टाळले होते. याआधी आरोग्य विभागाने दोनदा प्रत्यक्ष भेटी दिल्या, मात्र कुटुंबे उपस्थित नसल्याने प्रयत्न अयशस्वी ठरले.
News reporter :- अतुल दिघाडे
मात्र, दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता आरोग्य विभागाच्या टीमने पुन्हा प्रयत्न करत 40 ते 42 तात्पुरत्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली. कुटुंबांशी संवाद साधून लसीकरणाचे महत्त्व समजावले गेले. त्यांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यात आले. त्यानंतर त्वरित सुटलेली बालके ओळखून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
ही मोहीम आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांच्या देखरेखीखाली आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
सहानुभूती, चिकाटी व समाजाभिमुख कार्यपद्धतीचे मूर्त उदाहरण ठरलेली ही मोहीम “आरोग्य सर्वांसाठी” या ध्येयाला पूरक ठरते.
#VaccinationAwareness #MissionIndradhanush #HealthForAll #ChandrapurCMC #ArogyaMitra #MoHFWIndia #MahaArogya #AyushmanBharat #HealthyIndia #VaccineSeva