एसआयटी चौकशी च्या भीतीने शिंदेनी भाजप प्रवेश केला तर विद्यमान कॉग्रेस संचालकांचा स्वतःला वाचविण्यासाठी छुपा पाठिंबा?
चंद्रपूर:-
भ्रष्टाचार करणाऱ्यांची कधी जात नसते ती विकृती असतें आणि त्यामुळे कित्तेकांचे संसार उध्वस्त होते, चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेत सुद्धा 360 पदांच्या नोकर भरतीत कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून नोकर भरती घेतली, एक एक उमेदवार यांचे कडून 25 तें 40 लाख रुपये घेऊन त्यांना परीक्षेत पास करण्यात आले व नियमात बसत नसताना सुद्धा त्यांना ऐन वेळेवर नार्मलायझेशन पद्धत वापरून पास केले आणि नोकरीत सामावून घेतले परंतु आश्चर्यांची बाब म्हणजे ज्या गरीब विद्यार्थ्यांनी यूपीएस्सी एमपीएस्सी सारख्या परीक्षेची तयारी करत असतांना त्यांना नापास करण्यात आले तर ज्या व्यक्तीला साधा कॉम्पुटर चा माउस पकडता येत नाही त्या अल्पबुद्धीजीवी असलेल्या गोपाल सातपुते सारख्या व्यक्तीला तब्बल 71 टक्के गुण देऊन पास करण्यात आले व नोकरी देण्यात आली, अशा या भ्रष्ट नोकर भरतीचे भ्रष्ट संचालक मिळून आणि सत्ताधारी आमदार यांना सोबत घेऊन जो भ्रष्टाचाराचा खेळ खेळाला गेला त्यात कांग्रेस सोबत भाजपचे लोकं सुद्धा एकत्रितपणे या खेळात सामील होते आणि म्हणून सर्वानुमते ठरले की आता एसआयटी चौकशीतुन वाचायचे असेल तर रवींद्र शिंदे यासंह काही लोकं भाजप मध्ये पाठवून त्यांना अध्यक्ष बनवा म्हणजे भाजप च्या सत्तेत एसआयटी चौकशी थंड बस्त्यात जाईल आणि आपण बाइज्जत बरे होऊ. खरं तर या संदर्भात भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातमी प्रकाशित झाली होती की उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे भाजप मध्ये प्रवेश करणार व अध्यक्ष होणार आणि बंटी भांगडिया चे विश्वासू संजय डोंगरे उपाध्यक्ष होणार आज तीच बातमी खरी ठरली आहे.
आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे यांची तिसऱ्यांदा तर उपाध्यक्ष पदी संजय डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी मंच्यावर ज्यांची उपस्थिती होती त्यांचे चेहरे बघितले तर बैंकेच्या नोकर भरतीत आरक्षण डावलण्यात आले तेंव्हा हेच चेहरे कांग्रेस ची सत्ता असलेल्या बैंकेच्या नोकर भरती विरोधात बोलायला तयार नव्हते, खरं तर भाजप नेते जें राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा ओबीसी चे आरक्षण डावलले असताना सुद्धा एक वाक्य बोलायला तयार नव्हते याचा अर्थ भाजपचे आजी माजी आमदार, खासदार, नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे वगळता सर्व कांग्रेस प्रणित बैंकेच्या नोकर भरतीच्या भ्रष्टाचारात सामील होते आणि म्हणणूच नियोजनबद्ध पद्धतीने 100 कोटी पेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार करून ही जी नोकर भरती घेण्यात आली त्यात सगळ्यांनी मिळून गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त केले त्या सर्वाना आता जनतेसमोर उत्तर द्यावे लागतील एवढा आक्रोश आता या नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालका विरोधात आहे.
“बेगाने शादीमे अब्दुला दिवाना,” सारखी आमदार जोरगेवार ची भूमिका?
चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अती उत्साही आमदार म्हणून जोरगेवार यांचे नाव अग्रक्रमाणे घावेसे वाटते, कारण त्यांना एखादा विषय दिसला की त्यात आपणचं पुढे असावं असं त्यांना वाटतं, दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी वैकेच्या नोकर भरतीत लाखों रुपये घेतले जात आहे असे विधानसभा सभागृहात ओरडणारे जोरगेवार मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या निवडणुकीत मात्र जणू आपणच किंग मेकर आहोत अशा तोऱ्यात वावरत होते आणि जेंव्हा निकाल लागला आणि त्यात भाजप प्रणित 9 संचालक निवडून आले, त्या सर्वाना स्वतःच्या कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार आटोपला आणि आपणच बैंकेत सत्ता स्थापन करू अशा प्रसारमांध्यमाना प्रतिक्रिया दिल्या, म्हणजे स्वतःचा कर्तृत्वाने एकही संचालक निवडून आणता आला नसताना जणू आपणच सत्ता आणली असा अविर्भाव ते दाखवत होते त्यामुळे एका भाजप कार्यकर्तानी फेसबुक पोस्टवर “बेगाने शादीमे अब्दुला दिवाना” अशी पोस्ट टाकून आमदार किशोर जोरगेवार यांची खिल्ली उडवली होती.
अशी झाली अध्यक्षाची निवड आणि अशी होती उपस्थिती..
बैंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज मंगळवारी बँकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. बँकेच्या एकूण २१ संचालकांपैकी खासदार प्रतिभा धानोरकर वगळता २० संचालक उपस्थित होते. यावेळी एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या कॉग्रेस संचालकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शिंदे, उपाध्यक्ष डोंगरेंना पर्याय नसल्याने मान डोलवत छुपा पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. दरम्यान संचालक पदाच्या निवडणूकीपर्यंत कॉग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत असलेले शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हाच बँकेत भाजपाचा अध्यक्ष शिंदे यांच्या रूपाने बसणार असल्याचे स्पष्ट झाले होते व तशी बातमी भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर झळकली होती, आज केवळ निवडणुकीची औपचारिकता पार पडली. यावेळी बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मंचावर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, माजी मंत्री रमेश गजबे, माजी आमदार ॲड.संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे उपस्थित होते.
कांग्रेस चे संचालक भाजप च्या दावणीला?
बैंकेत कांग्रेसचीच सत्ता येईल असं वाटतं असतांना कॉग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे विश्वासू संचालक जयंत टेमुर्डे, रोहित बोम्मावार, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांमुळे विजयी झालेले कॉग्रेसचे विजय बावणे तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार समर्थक संचालक दामोदर मिसार निवडणुकीत व कार्यक्रमात भाजपा सोबत दिसले. खरंतर कॉग्रेसच्या चार संचालकांनी छुपा पाठिंबा दिला. याचाच अर्थ कॉग्रेसच्या संचालकांनी आणि पेनेल मधील संचालकांनी कांग्रेस च्या नेत्यांना मुर्ख बनविले आणि ते भाजप च्या दावणीला बांधल्या गेले.
एसआयटीचं भूत कुणाच्या मानगुटीवर ?
बैंकेच्या नोकर भरतीत झालेल्या घोटाळ्याची अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात पाच पोलीस अधिकाऱ्यांचे पथक ही चौकशी करणार आहे. त्यामुळे आता नवनिर्वाचित अध्यक्ष जें स्वतः या नोकर भरतीचे मुख्य कलाकार होते आणि त्यांच्या घरातूनच बैंक नोकर भरतीची सूत्रे हलली त्यांची काय चौकशी होणार हा वेळेच ठरवेल परंतु अमरावती च्या एका टीम ने नोकर भरतीत वापरल्या गेलेले कॉम्पुटर सॉफ्टवेअर आणि त्याचा अंतर्गत डाटा याबद्दल पुरेषे पुरावे एका ठिकाणी दिले आहे त्यामुळे एसआयटीचे भूत विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष व तत्कालीन संचालक यांच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की.
बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती विरोधातील लढा सुरूच राहणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी स्वतः सर्व जाती समुहाच्या जातीय संघटनाना घेऊन आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती स्थापन करून जो लढा दिला तो चंद्रपूर च्या इतिहासात कायम स्वरूपी नोंदवीला जाईल, कारण जिथे सत्ताधारी आणि विरोधक आपसात नोकर भरतीत मिळून भ्रष्टाचार करत होते आणि आरक्षणाच्या नावावर मोर्चे काढणारे मागासवर्गीय नेते झोपेच सोंग घेऊन घरी बसले होते अशावेळी राजू कुकडे यांनी मुठभर समाजातील कार्यकर्त्यांना घेऊन 28 दिवस आंदोलन करून जो लढा दिला to निर्णयक ठरला आणि याची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली, एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांना मोबाईल वरून संपर्क करून तुमच्या मागण्या लवकरच चौकशी करून पूर्ण करेन असे आश्वासन दिले ते खऱ्या अर्थाने आंदोलनाचे फलित होते, मात्र त्यासोबतच आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या लढ्याला साथ देत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आवाज बुलंद करून मुख्यमंत्र्यांना एसआयटी चौकशी लावण्यास भाग पाडले त्यामुळे त्यांचे मोठे योगदान आहे, पण आता सत्ताधारी भाजप आपल्याच बैंकेतील सत्तेच्या विरोधात चौकशी करून कारवाई करून नोकर भरती रद्द करेल का? हा प्रश्न उभा राहत आहे, मात्र आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आरक्षणाचा लढा कायम राहिलं आणि गरीब हुशार विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी हा लढा शेवटच्या क्षणापर्यंत लढू असे सूचक वक्तव्य राजू कुकडे यांनी केलं आहे.