📰
भाजपा कार्यकर्त्यांना जबाबदारी म्हणजे गौरव – सुधीर मुनगंटीवार; मूल तालुक्यात नवनिर्वाचित अध्यक्षांचे उत्साहात स्वागत
🌟 ( मूल ) न्यूज़ :- आज भाजपा नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मूल भेटीदरम्यान मूल येथील भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी नुकतेच निवडून आलेले मूल तालुका भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर मारगोनवार आणि मूल शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.
News reporter :- अतुल दिघाडे
या भेटीदरम्यान मुनगंटीवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षातील कार्यकर्त्यांना जबाबदारी मिळाल्यावर त्यांची कार्यक्षमता व काम करण्याची उर्मी दुप्पट होते, असे नमूद केले. “पक्षासाठी झपाटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व जेव्हा त्यांच्या हाती दिले जाते, तेव्हा संघटनेचे खरे बळ वाढते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन करताना सुधीरभाऊ म्हणाले, “आपण दोघांनी पक्षाचे कार्य गावोगावी, वॉर्डागणिक आणि बूथस्तरावर अधिक बळकट करावे, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.”
कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते व महिला मोर्च्याच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून मूल तालुक्यात भाजपा अधिक बळकट आणि सशक्त होणार असल्याचे संकेत मिळाले.