Home Breaking News संतापजनक :- रामपूर येथे भवानी मातेच्या मंदिराला दान दिलेली जागा एका मुस्लिम...

संतापजनक :- रामपूर येथे भवानी मातेच्या मंदिराला दान दिलेली जागा एका मुस्लिम महिलेसह इतरांनी हडपली?

देवस्थानची देखभाल करणाऱ्या सदस्य देविदास चव्हाण यांचा आरोप, पण उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी न्यायालयाचे आदेश धुडकावले?

राजुरा:-

तालुक्यातील मौजा रामपुर तह राजुरा भू.कं ३०/२ आराजी हे 0.८० आर या जमिनीच्या ओपन स्पेस असणाऱ्या 8 गुंठे जमिनीवर भवानी मातेच्या मंदिरासाठी जमीन दान देण्यात आली असून त्या जागेवर पुरातन मुर्त्याचे अवशेष आहे, दरम्यान याचं ओपन स्पेस जागेवर एका खान नावाच्या मुस्लिम महिलेसह इतरांनी बनावट कागदपत्र बनवून त्या जागेवर अतिक्रमन केले आहे, त्या संदर्भात तेथील रहिवाशी आणि भवानी माता देवस्थान चे सदस्य देविदास चव्हाण यांनी स्थानिक भाविक भक्तांना घेऊन आक्षेप घेतला आणि बनावट कागदपत्र बनवून मंदिराची जागा हडपणाऱ्या खान आडनाव असलेल्या महिलेच्या व इतरांच्या विरोधात स्थानिक तहसीलदार ते जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यासंह महसूल मंत्री यांना तक्रारी देऊन मंदिराची जागा हडपणाऱ्या महिलेचे व इतरांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली, दरम्यान संबंधित खान यांनी बनविलेले दस्तावेज हे बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश स्थानिक दिवाणी न्यायालय ते उच्च न्यायालय यांच्या मार्फत देण्यात आले, मात्र स्थानिक उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्फत मोका चौकशी करिता जें आदेश मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना देण्यात आले, त्यांनी मोका चौकशी अहवाल सादर न करता मंदिराच्या जागेवर अतिक्रमन करणाऱ्या खान नावाच्या महिलेसह अतिक्रमण हटवले नाही याचा अर्थ हे प्रशासन सदर अतिक्रमन करणाऱ्यांना संरक्षण देत आहे, त्यामुळे येणाऱ्या दुर्गोत्सव आणि नवरात्र च्या उत्सवात भाविक भक्तांना माता भवानीच्या मंदिरात दर्शन घेतांना स्वतःची गाडी पार्किंग करण्याची जागा पण उपलब्ध नसल्याने या मंदिराचे सदस्य यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपविभागीय अधिकारी व स्थानिक तहसीलदार यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात राजुरा येथील उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांचे न्यायालयात स्थानिक तहसीलदार, मंडळ अधिकारी यांचे विरोधात प्रकरण उद्या दिनांक 15 सप्टेंबर ला सुनावणी करिता ठेवले असून येणाऱ्या दुर्गोत्सव व नवरात्र महोत्सव निमित्य भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक भक्त मंदिरात येतात त्यांना सुविधा मिळावी यासाठी प्रशासनाकडून चांगला निर्णय होणे अपेक्षित आहे, परंतु स्थानिक तहसीलदार मंडळ अधिकारी यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे हजारो भाविक भक्तांच्या आशेवर पाणी फेरून जर उपविभागीय अधिकारी यांनी मंदिराच्या ओपन स्पेश वरील अतिक्रमन काढले नाही तर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार हे उच्च न्यायालयाचा अवमान करीत आहे हे सिद्ध होईल आणि त्यामुळे या मंदिर परिसरात काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी उपविभागीय अधिकारी हे जबाबदार राहिल असा इशारा देविदास चव्हाण यांच्यासह मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेतून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here