Home वरोरा वरोरा येथे सरकार ग्रुप कडून गरजू गोरगरीबांना भाजीपाला व राशन वाटप

वरोरा येथे सरकार ग्रुप कडून गरजू गोरगरीबांना भाजीपाला व राशन वाटप

सरकार ग्रुपचे संस्थापक
कशिफ खान यांचा पुढाकार

वरोरा प्रतिनिधी :-

कोरोना व्हायरसमुळे देश पूर्णतः लाकडाऊन करण्यात आला आहे.त्यामुळे कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आणि प्रशासनाला स्पष्ठ निर्देश असल्याने निर्देश व नियमांचे पालन होत असून नागरिकांना घराचे बाहेर न पडता घरातच राहावे लागत आहे.त्यामुळे गोरगरिबांच्या मजूरी बंद झाल्याने व पैसा नसल्याने अन्न, धान्य भाजीपाला घेऊ शकत नाही.वरोरा येथील सरकार ग्रुपचे संस्थापक काशिफ खान यांनी सामाजिक दायित्व जोपासून नागरिकांना भाजी व राशन वाटप केले.
शहरातील सुभाष वॉर्ड,(छत्तीसगडी टोला),कॉलरी वॉर्ड,एकार्जुना चौक परिसरात वसलेल्या कामगारांच्या झोपड्या व शहरात असलेले गरजू लोक यांना हप्त्याभराचा भाजीपाला व राशन वाटपाचा कार्यक्रम गेली चार दिवसा पासून सुरू आहे.पुन्हा काही गरज भासल्यास सरकार ग्रुपशी संपर्क साधावा असे आश्वासन सरकार ग्रुपचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते कशिफ खान यांनी दिले आहे.
गोरगरीब, मजुरदार लोकांच्या सदोदित आपण त्यांच्या पाठीशी राहणार असून,सरकार ग्रुपची स्थापना गोरगरीब जनतेच्या सेवेसाठीच निर्माण करण्यात आला असून त्यांना वेळप्रसंगी मदत करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहू ,लाकडाउन चे तारखेपर्यंत आपण त्यांना भाजीपाला व राशन देण्यास सदैव तयार राहणार आहे.अशी प्रतिक्रिया सरकार ग्रुपचे संस्थापक काशिफ खान यांनी दिले.

सरकार ग्रुपचे संस्थापक काशिफ खान,व सदस्य संदीप भाऊ सोनेकर,अरीफ अली काशिफ काजी,राहुल लोणारे,हर्षद घोडीले, संकेत बावणे,तेजु दाऊद शेख,आलेख रठ्ठे व इतर सदस्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here