Home कोरपणा धक्कादायक :-माणिकगड सिमेंट कंपनी च्या अन्यायाचा आदिवासी   कुळमेथे ठरला पहिला बळी !

धक्कादायक :-माणिकगड सिमेंट कंपनी च्या अन्यायाचा आदिवासी   कुळमेथे ठरला पहिला बळी !

जिवंतपणी संघर्ष करुण सुद्धा अपयशी ठरल्याने घेतला अखेरचा श्वास, कुटुंब उघडयावर ! कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

गडचांदूर येथील नामांकित माणिकगड सिमेंट  कंपनीने कुसुंबी येथील आदिवासी देऊ कुळमेथे यांची जमीन बळजबरी व मुजोरी ने चुनखडी उत्खनन करून त्याची शेती नष्ट केली होती, याबाबत शासन-प्रशासन यांच्याकडे अनेक तक्रारी व न्यायासाठी मागणी करून लक्ष वेधले परंतु याबाबत न्याय मिळत नाही व प्रशासन लक्ष घालत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायासाठी यांनी प्रकरण दाखल केले आहे. यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली व त्यांच्या कार्यालयापुढे भीक मांगो आंदोलन केले आणि जमा झालेला निधी कुळमेथे यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी वापरला पण त्यांची प्रकृती  पूर्णपणे खालावली त्यामुळे तात्पुरती जिल्हा रुग्णालयात उपचारही करण्यात आला मात्र अखेर त्यांनी जिल्हा धिकारी करून जीवनयात्राच संपवली,  डॉक्टर खेमनार यांनी तहसिलदारामार्फत 22 फेब्रुवारीला स्थळदर्शक चौकशी करून अहवाल मागितला होता मात्र माणिकगड सिमेंट कंपनीने सीमांकन चिन्ह दगडच नष्ट केल्याने व मंजूर असलेल्या उत्खनन पट्ट्या पेक्षा अधिक जमीन कंपनीच्या ताब्यात असल्याने तहसीलदार बेडसे पाटील व भूमी अभिलेख निरीक्षक जाधव यांनी स्थळदर्शक पाहणी करून पंचनामा केला मात्र दगडा नष्ट झाल्याने नेमका किती जमिनी बळकावल्या याबाबत बोध होत नसल्याचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवले,  मात्र सतत संघर्ष करूनही अखेर

कुळमेथे यांनी आपल्या अखेरचा श्वास घेऊन कुटुंब उघड्यावर पाडले, त्यांनी आठ एकर मालकीची जमीन कंपनीने नष्ट करून चुनखडी उत्खनन केल्याची तक्रार पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी यांच्याकडे दाखल केल्या होत्या आमरण उपोषण करून संविधानिक मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र प्रशासनाने अखेर या आदिवासींना न्याय देण्यामध्ये असफल ठरल्याने त्याने अखेरचा श्वास घेत आपला संघर्ष संपविला आज मात्र 80 वर्षे वयाची पत्नी ताराबाई मुलगा महादेव व दिपक हे गरिबीशी झुंज देत असून रोजंदारी कामावर जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे संचारबंदी लॉक डाऊनलोड झाल्याने अनेक अडचणी शी हे कुटुंब संघर्ष करीत आहे देऊ यांच्या मृत्यूला माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापन जबाबदार असून शोषण व अत्याचारामुळे यांचा मृत्यू घडल्याचा आरोप कुटुंबाने केला असून माणिकगड सिमेंट व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here