Home वरोरा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींचा “मै कोरोना किंग हू ” हा कागद दाखवून व...

विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींचा “मै कोरोना किंग हू ” हा कागद दाखवून व हार टाकून सत्कार !

शेगाव ठाणेदार बोरकुटे यांच्या नेत्रुत्वात दोन चाकी वाहनासह इतर वाहन चालकांचा अनोखा सत्कार !

शेगाव प्रतिनिधी :-

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने एका लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला असून वीस लाखांपेक्षा जास्त लोकं उपचार घेत आहे.भारतात कोरोनाचे रुग्ण सगळ्या राज्यात वाढत असतांना आता राज्यात कोरोनाने आपला विळखा आणखी घट्ट केला आहे. कारण अवघ्या काही तासात राज्यात १३४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात काही तासांपूर्वीच १३४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील रुग्णांची संख्या १८९५ झाली आहे.

आज सकाळी रुग्णाची संख्या १७६१ एवढी होती. मात्र आता नव्या १३४ रुग्णांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही तासात राज्यात १३४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी तब्बल ११३ रुग्ण हे मुंबईतील आहे. तर मीरा-भाईंदरमध्ये सात रुग्ण आढळले आहेत. याशिवाय पुण्यात देखील चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे शिवाय महाराष्ट्रात सुध्दा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असतांना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध उपाययोजनेमुळे कोरोना पिडीत रुग्ण सापडले नही. मात्र तरी सुद्धा खबरदारी घेणे गरजेचे असून पोलिस प्रशासनाने आता नवी क्लुप्ती असून वरोरा तालुक्यातील शेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरकूटे यांच्या नेत्रुत्वात संचारबंदी असतांना विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचा हार घालून व त्यांच्या हातात “मै कोरोना किंग हू ” अशा आशयाचे कागद हातात देवून त्यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला, यावेळी उपपोलिस निरीक्षक जाधव, डाखरे, चौधरी, दातारकर इत्यादी पोलिस कर्मचाऱ्यांनी ही सत्कार करून कारवाई केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here