लक्षवेधी :-
देशातील अनेक राज्यात आणि विदेशात अडकलेल्या लोकांना घरी कसे पोहचवीणार ? कारखाने कंपन्या, कार्यालये, दुकाने, मॉल व इतर छोटे व्यवसाय बंद असलेल्यांना पगार व इतर काय मदत देणारं ? कामे बंद झाल्याने घरातच राहणाऱ्याना व्यक्तींच्या लाईट बिल, घर किरायाचे काय ? केंद्राची राज्याला मदत त्वरित करण्याची काय उपाययोजना ? महाराष्ट्र राज्याचे केंद्राकडे २६ हजार कोटी अडकलेले आहे त्याचे काय ? देश नोटाबंदीनंतर पुन्हा आर्थिक संकटात जाईल त्यावर उपाययोजना काय ?
कोरोना भाषण !
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत आणखी वाढवला आहे. त्यामुळे २१ दिवसांसाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत कायम राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मात्र ‘२० एप्रिलपर्यंत प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली जाईल व ज्या भागात कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न होईल आणि जो भाग या अग्निपरीक्षेत यशस्वी होईल, त्यांना २० एप्रिलनंतर काही अत्यावशक सेवेसाठी सशर्त अनुमती दिली जाईल. बाहेर पडण्यासाठी कडक नियम राहतील. लॉकडाऊनची नियम तुटले तर सर्व परवानगी मागे घेतली जाईल. बेजबाबदार वागू नये, इतरांनी बेजबाबदार वागू नये.’ असं मोदी यावेळी म्हणाले.
‘या संदर्भात उद्यापासून सरकारकडून विस्तृत सूचना दिल्या जातील. प्रधानमंत्री गरीब न्याय मंत्री योजनेतून गरीबांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनात देखील या घटकांना सूट देण्याचा विचार आहे. रब्बी हंगाम संपण्याचा मोसम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष सवलत देण्याचा विचार आहे. अन्नधान्य पुरवठा मुबलक आहे.’ असंही पंतप्रधान म्हणाले.
जिथे आहे तिथेच राहा, लॉकडाऊनचं ३ मे पर्यंत पालन करा. देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे देशवासियांनी त्याची काळजी करु नये. मात्र जर या काळात येथील लोकांनी नियम मोडले तर सर्व अनुमती मागे घेतली जाईल असा ईशारा सुद्धा त्यांनी दिला,
त्यांनी पुढे सांगितलं की मोठ्या देशातील परिस्थिती लक्षात घेता भारताने ही परिस्थिती खूपच चांगली हाताळली आहे. देशात जेव्हा ५०० रुग्ण होते तेव्हाच संपूर्ण लॉकडाऊनचा अत्यंत मोठा निर्णय घेतला होता. तुमच्या अडचणी मी समजू शकतो, पण तुमच्या मदतीनेच कोरोनावर मात करता येणार आहे. इतर देशाच्या तुलनेत भारताने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला त्याचे आपण साक्षीदार असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले व कोरोना रुग्णांची
‘२२० लँबमध्ये टेस्टिंग केली जाईल. कोरोनाचे १० हजार रुग्ण झाल्यानंतर १५०० बेडची गरज भासते. भारतात एक लाख बेडची सोय केली आहे. ६०० हून अधिक रुग्णालये कोविडवर काम करत आहे. या ठिकाणी आणखी सुविधा दिल्या जातील. भारतातील तरुण वैज्ञानिकांना माझे आवाहन आहे की त्यांनी या आजारावर लस शोधण्यासाठी पुढे यावे.’ असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
खरं तर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या भाषणात देशातील श्रमजीवी, कष्टकरी, कामगार, छोट्या मोठ्या दुकानात, कार्यालयात आणि ऊद्दोगात काम करणाऱ्यां लोकांना आर्थिक मदत काय मिळणार ? देशातील अनेक राज्यात आणि विदेशात अडकलेल्या लोकांना घरी कसे पोहचवीणार ? कारखाने कंपन्या, कार्यालये, दुकाने, मॉल व इतर छोटे व्यवसाय बंद असलेल्यांना पगार व इतर काय मदत देणारं ? कामे बंद झाल्याने घरातच राहणाऱ्याना व्यक्तींच्या लाईट बिल, घर किरायाचे काय ? केंद्राची राज्याला मदत त्वरित करण्याची काय उपाययोजना ? महाराष्ट्र राज्याचे केंद्राकडे २६ हजार कोटी अडकलेले आहे त्याचे काय ? देश नोटाबंदीनंतर पुन्हा आर्थिक संकटात जाईल त्यावर उपाययोजना काय ? यांवर बोलायला हवे होते, आणि देशातील जनतेची हीच अपेक्षा होती, मात्र थाळ्या वाजवणे आणि दिवे लावणे यापलिकडे जावून देशातील जनतेला शाश्वत असा संदेश मोदी देणारं अशी अपेक्षा असतांना पुन्हा एकदा मोदींनी देशातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे.