Home महाराष्ट्र आश्चर्यकारक :- वणीतील दारू दुकानाच्या निमित्ताने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि खासदार धाणोरकर...

आश्चर्यकारक :- वणीतील दारू दुकानाच्या निमित्ताने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि खासदार धाणोरकर यांच्यात जुंपली ?

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची दारूचे दुकान बंद करण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे तक्रार, खासदार वाळू धाणोरकर यांचे आमदाराला आव्हान ” दम असेल तर दारू दुकान बंद करून दाखवा “

वणी प्रतिनिधी :

वणी शहरातील पार्थ वाईन शॉप हे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या निशाण्यावर असून गेल्या वेळी आमदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे कारण देत तर यावेळी बाजारातील दारू दुकानांना परवानगी नसताना दुकान सुरू कसे ? असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र सदर वाईन शॉप हे खासदार वाळू धाणोरकर यांच्या मालकीचे असल्यामुळे आमदार या निमित्ताने राजकीय गेम करण्याच्या तयारीत तर नाही ना ? असा प्रश्न पडत आहे. तस बघता वणीचे आमदार यांचे या भागातील जणतेप्रती कर्तव्य काय ? आणि आत्तापर्यंत त्यांनी वणीकराना किंव्हा विधानसभा क्षेत्रातील जनतेला काय सहकार्य दिलं हा संशोधनाचा विषय ठरत असतांना आता जेव्हां सरकार तर्फे महाराष्ट्राच्या महसूल वाढी करिता वाईन शॉप सुरू केले तर आमदारां सोशीयल डिस्टेन्स चा एवढा पुळका कशासाठी ? आणि जेव्हापासून भाजप सरकार महाराष्ट्रात होतं त्या सरकारच्या चुकीच्या निर्णयाचे भाषांतर चांगल्या निर्णयात करण्याचं पातक हेच आमदार करायचे, हे जनतेने बघितलं आहे मात्र आता जनतेच्या आग्रहाखातर राज्य सरकारने दारूचे दुकान चालू करून एक प्रकारे जनतेच्या आणि राज्याच्या हिताचा निर्णय घेतला त्याला व्यक्तिशः राजकीय द्रुष्टीने विरोध करणे हे कितपत योग्य आहे ? या विषयावर खासदार बाळू धानोरकर सुद्धा फार आक्रमक झाले असून त्यांनी ‘दम’ असेल तर आमदारांनी दारूचे दुकान बंद करून दाखवावे असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे आमदार आणि खासदार यांच्यात चांगलीच जुंपली असून येणाऱ्या काळात हा सामना चांगलाच रंगणार असल्याचे दिसत आहे.

बुधवारी वणीतील पार्थ वाईन शॉपसह दोन देशी दारूचे दुकान उघडले होते. पार्थ वाईन शॉपवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असे कारण देत आमदारांनी त्याबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्याच रात्री लगेच जिल्हाधिका-यांनी पुढील आदेश दारू विक्रीला परवानगी नााही असा आदेश काढला होता. दारूचे दुकान आपल्या तक्रारीमुळे बंद झाल्याचा दावा करत याचे श्रेय आमदार बोदकुरवार यांनी घेतले होते. मात्र त्यांच्या गोटातील हा आनंद केवळ चार दिवसाचा ठरला आणि रविवारी जिल्हाधिका-यांनी पुन्हा दारू सुरू करण्याची परवानगी देवून आमदारांच्या आनंदाचे संतापात रूपांतर झाले. आणि आमदारांचा जणू मिठु पडला अशी चर्चा रंगू लागली आहे.

या प्रकरणी केवळ आमदारांना शह देण्यासाठीच खा. बाळू धानोरकरांनी दारूची दुकाने सुरू करायला प्रशासनाला भाग पाडले अशीही प्रतिक्रिया दिवसभर राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु आमदारांनी आक्रमक होत आज पुन्हा जिल्हाधिका-यांकडे तक्रार करून
बाजारातील दुकान सुरु का?
शहरी भागातील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने सुरू करता येणार नाही असा आदेश असताना वणी शहरातील नगर परिषदच्या भाजीपाला मार्केटलाच लागूनच असलेल्या बाजारपेठतील एक वाईन शॉप व गांधी चौकालगत असलेले दुसरे वाईन शॉप सुरू का? असे प्रश्न उपस्थित केले आहे. मात्र आमदारांच्या त्या तक्रारी ला उत्तर देतांना ‘दम’ असेल तर दुकान बंद करून दाखवावे असे आव्हान खा. धानोरकर यांनी केल्याने आता आमदार खासदार यांचा संघर्ष वणी क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here