Home भद्रावती मोठी बातमी :- अखेर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या पाठपुराव्याने रेती माफिया...

मोठी बातमी :- अखेर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या पाठपुराव्याने रेती माफिया वासुदेव वर गुन्हा दाखल !

उपविभागीय अधिकारी शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांनी प्रत्यक्ष रेती साठे जप्त करून वासुदेव च्या मुसक्या आवळल्या ! भद्रावती तालुक्यात आनंदाचे वातावरण ? अजूनही रेती साठे असल्याची शंका त्यामुळे पुन्हा कारवाई होणार. शिंदे यांचे संकेत ?

रेती चोरी भाग – ५

विदर्भात सर्वात मोठ्या प्रमाणात रेती चोरीचे प्रकरण भद्रावती येथे घडत असल्याचा धक्कादायक प्रकार भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारे समोर आणल्यानंतर महसूल विभाग प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र भद्रावती तहसीलदार शितोळे यांचे रेती माफिया वासुदेव सोबत असलेले अर्थपूर्ण सबंध समोर आल्यामुळे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि पिंपरी, चारगाव, कुणाडा, तेलवासा ढोरवासा या परिसरात जवळच्या नदीतून बेकायदेशीर पणे रेती उपसा करून जे रेतीचे साठे लपवून ठेवले होते त्याचा शोध घेतला विशेष म्हणजे हे रेतीचे साठे रेती माफिया वासुदेव ठाकरे यांचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने भद्रावती पोलिस स्टेशन मधे दिनांक १३ मे ला अपराध क्रमांक २४६/२० भांदवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

रेती माफिया वासुदेव यांनी भद्रावतीच नव्हे तर जवळच्या वणी क्षेत्रात सुद्धा चोरीच्या रेतीचा काळा धंदा जोमात चालवून आपले एकछत्री राज्य चालवीलेले होते. वासुदेव यांनी तहसीलदार शितोळे यांच्यासोबत मिळून राष्ट्रीय संपत्तीची चोरी मोठ्या प्रमाणात करतांना छोटे ट्रक्टर चालक मालक यांच्या छोट्याशा धंद्यावर मोठा परिणाम केला होता, नव्हे त्यांना देशोधडीला लावले होते. त्यामुळेच भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून वासुदेव यांचा तहसीलदार यांच्यासोबत च्या छुप्या समझोता करार समोर आणण्यासाठी बातम्यांची मालिका सुरू केली होती व विस्तार पूर्वक सगळी माहीती समोर आणली होती. त्याच आधारे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी एक प्लान तयार करून उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांना सोबत घेवून वासुदेव ठाकरे यांचे सर्व रेती साठे शोधून काढले आणि शेवटी वासुदेव ठाकरे यांच्यावर तहसीलदार शितोळे यांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला. अर्थात ही भुमोपुत्राची हाक न्यूज पोर्टल ची मोठी उपलब्धी असून स्वतः उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी याबद्दल भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल टीमचे आभार मानले आहे .
आता या रेती चोरी प्रकरणाचे दूरगामी परिणाम हे भद्रावती तालुक्यात होणार असून केवळ मीच मालक आणि मीच रेती चोरी केली पाहिजे माझ्यासमोर कुणीही स्पर्धा करायला नको अशा आविर्भावात वावरणाऱ्या वासुदेव सारख्या रेती माफियाच्या दुकानदाऱ्या आता बंद होणार आहे. यानंतर वाघ आणि कर्नाटका एम्टा कोळसा कोणते वळण घेणार हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

Previous articleधक्कादायक:-आमदारांचे पगाराला लागतात ५ अब्ज !! माजी आमदारांच्या पेन्शनवर कोटींची उलाढाल !!
Next articleमहत्वाची बातमी :-चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here