Home चंद्रपूर महत्वाची बातमी :-चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी.

महत्वाची बातमी :-चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी.

जीवनावश्यक दुकाने सकाळी 7 ते 5 सुरू,अन्य दुकाने सकाळी 10 ते 5 सुरू राहतील

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) चे कलम 144 चे अन्वये जिल्ह्यात दिनांक 11 मे 2020 पासून ते 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन मध्ये सुरू असणार्‍या आस्थापना बाबत निर्गमित करण्यात आलेले आहे.चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच राहतील. असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे.

या वेळेत सुरू असनार आस्थापना,दुकाने :

जीवनावश्यक खाद्यपदार्थ, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतुक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, बेकरी, पशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.परंतु,दुकान,आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण इत्यादी आस्थापना,दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना, दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत सुरू राहतील व रविवारला सदर दुकाने पूर्णत: बंद राहतील. परंतु, दुकान, आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणते प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 14 मे ते 17 मे या कालावधीकरिता लागू राहील. परंतु, चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपुरचे क्षेत्राकरिता लागू राहणार नाही.

Previous articleमोठी बातमी :- अखेर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या पाठपुराव्याने रेती माफिया वासुदेव वर गुन्हा दाखल !
Next articleधक्कादायक :- केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड.लॉक डाऊनच्या काळात येवढा साठा आला कुठून? जनतेचा सवाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here