Home चंद्रपूर धक्कादायक :- केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड.लॉक डाऊनच्या काळात...

धक्कादायक :- केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड.लॉक डाऊनच्या काळात येवढा साठा आला कुठून? जनतेचा सवाल.

20 ते 25 लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू व घुटका जप्त. आरोपी व्यापारी आरिफ कोलसावाला याला अटक !

चंद्रपूर प्रतिनिधी:-

देशभरात लॉक डाऊनच्या काळात अनेक अवैध व्यवसाय सुरू झाले असून जिल्हा बंदी असतांना सुगंधीत तंबाखू सारखे प्रतिबंधित पदार्थ जिल्ह्यात येतातच कसे हा खरा प्रश्न असून लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अनेक व्यवसायिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी झाले आहेत त्यात महत्वाचे म्हणजे पान ठेले बंद ठेवण्याचे सर्वप्रथम आदेश झाले होते. मात्र जनतेची प्रचंड मागणी आणि या धंद्यातून मिळणार प्रचंड नफा यामुळे हा व्यवसाय छुप्या मार्गाने नियमित चालू असून काही राजकीय कार्यकर्त्यांनी तर या सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांना ब्लैकमेलिन्ग करून त्यांचे कडून लाखो रुपयाची आमदणी केली असल्याची गंभीर बाब प्रकाशात येवून खुद्द एका तंबाखू व्यापाऱ्यांनी हा खुलासा केला होता व त्याची ऑडियो रेकॉर्डिंग सुद्धा आहे. अर्थात या अवैध व्यवसायाला राजकीय व प्रशासकीय व्यक्तींनी आपले कमाईचे साधन म्हणून बघितल्याने हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.
महत्वाची बाब म्हणजे अगोदरच थुंकीमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे सिद्ध झाले असल्याने पान व खर्रा शौकीन जिथे तिथे पिचकारी मारत असतात त्यामुळे ह्या वरील बंदी कायम आहे. संपुर्ण राज्यात 2012 पासून सुगंधित तंबाखू व घुटका विक्रीवर संपुर्ण बंदी आहे. तरीही राज्यात सुगंधित तंबाकू, गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे आश्चर्य व्यक्त होतं आहे.

ह्याच अनुषंगाने लगेच दुसऱ्या दिवशी पडोली येथील केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व कार्यकर्त्यांनी धाड मारली असता त्या गोदामात 34 बोऱ्यांमध्ये सुगंधित तंबाकू, गुटख्याचा साठा आढळून आला, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली असता पोलीस लगेच उपस्थित होत सदर गोदामातिल साठ्याचा पंचनामा केला, त्या साठ्याची किमंत जवळपास 20 ते 25 लाख रुपये आहे असे सांगण्यात येत आहे.

महत्वाची बाब म्हणजे सीमाबंदीत हा साठा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आला कसा? पोलिसांच्या नजरेतून हा साठा चुकला कसा याची चौकशी व्हायला हवी.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू चा व्यापार करणारे आरिफ कोलसावाला यांना अटक केली आहे.

Previous articleमहत्वाची बातमी :-चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी.
Next articleसनसनिखेज:- लॉक डाऊनमधे एसीसी सिमेंट कंपनीतील सळाखीचा घूग्गूस येथील बांधकामात वापर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here