Home चंद्रपूर सनसनिखेज:- लॉक डाऊनमधे एसीसी सिमेंट कंपनीतील सळाखीचा घूग्गूस येथील बांधकामात वापर ?

सनसनिखेज:- लॉक डाऊनमधे एसीसी सिमेंट कंपनीतील सळाखीचा घूग्गूस येथील बांधकामात वापर ?

एका राजकीय कंत्राटदाराच्या घराजवळ बांधकाम सुरू, एसीसी सिमेंट कंपनी व्यवस्थापन झोपले की झोपवले ? घूग्गूस मधे खळबळ ..

घूग्गूस प्रतिनिधी :-

मागील काही महिन्यापूर्वी घूग्गूस नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनी च्या नॉट फॉर सेल सिमेंट चोरी प्रकरणाची चौकशी सीआईडी मार्फत झाली होती व तत्पूर्वी कंत्राटदार राजु रेड्डी यांचेवर नॉट फॉर सेल सिमेंट चोरी प्रकरणात घूग्गूस पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता त्या घटनेला एक वर्ष होतं असतांना पुन्हा एसीसी सिमेंट कंपनीच्या गोडाऊन मधून वार्ड क्रमांक ६ जनता शाळेच्या समोर एका हॉल बांधकामासाठी एसीसी कंपनीमध्ये असलेल्या गोडाऊन मधील सळाखीचा वापर होतं असल्याची घूग्गूस परिसरात सनसनिखेज चर्चा होतं असून एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हया
सळाखीचा जखीरा बाहेर गेल्याचे बोलल्या जात आहे. घूग्गूस येथे अशीही चर्चा आहे की एसीसी कंपनीतील सळाखीचा माल lodha gold – 20mm. 10mm. 8mm. असून तो मार्केट मधे उपलब्ध नाही त्यामुळेच जे बांधकाम राजु रेड्डी यांच्या घराला लागून सुरू आहे त्या बांधकामात एसीसी सिमेंट कंपनी च्या सळाखीचा माल वापरला जात असेल तर एसीसी सिमेंट कंपनी च्या प्रशासनाला झोप आली की त्यांना झोपवले अशी शंका असून  पुन्हा  नॉट फॉर सेल सिमेंट चोरी प्रकरणाची पुनरावृत्ती होईल अशी सुद्धा चर्चा असल्याने या प्रकरणी पोलिस निरीक्षक घूग्गूस यांच्यासह एसीसी सिमेंट कंपनी व्यवस्थापन यांनी तत्काळ या प्रकरणी तातडीने कारवाई करून एसीसी मधून सळाखीसह लोखंडी रॉड व एन्गल कसे काय बाहेर आले ? याची चौकशी करावी अशी मागणी होतं आहे. दरम्यान लॉक डाऊन मधे सर्व बांधकामाना शासनाची परवानगी नसतांना लॉक डाऊन च्या काळात हे बांधकाम झाले कसे ? हा गंभीर प्रश्न असून एसीसी सिमेंट कंपनी च्या अधिकाऱ्यांचा हया सळाखी चोरी प्रकरणात हात असावा अशी शंका असून दिनांक ९ मे ला एका कंपनी गेट मधून एका गाडीने हया सळाखी व लोखंडी रॉड एन्गल आले असल्याची नोंद आहे अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी घूग्गूस येथील ठाणेदार करतील का ? हा प्रश्न अती महत्वाचा असून ज्या व्यक्तींनी ही चोरी केली असेल त्याचेवर चोरीचा गंभीर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here