Home कोरपणा स्टुडंट फोरम ग्रुपतर्फे अभ्यासिका सुरू करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन.

स्टुडंट फोरम ग्रुपतर्फे अभ्यासिका सुरू करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन.

प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी:-

कोरपना येथील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टुडंट फोरम गृप च्या वतीने कोरपना शहरातील मिशन सेवा अंतर्गत बांधण्यात आलेली अभ्यासिका सुरू करण्याबद्दल आज कोरपना तहसील कार्यालय येथे मा नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. स्टुडंट फोरम ग्रुपची मागणी व केलेला पाठपुरावा तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नातून कोरपना शहरात सुसज्ज अशी अभ्यासिका तयार करण्यात आली, पण औपचारिक लोकार्पना अभावी ती बंदावस्थेत आहे. सध्या लॉक डाऊन च्या काळात परिसरातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसोय होत असून त्यांच्या हितासाठी ही अभ्यासिका सुरू करण्याची मागणी केली आहे.तसेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकरिता पुणे,नागपूर,जळगाव, औरंगाबाद ,इ. ठिकाणी गेलेली मुलेही स्वगावी परतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांची तारीखही घोषित केली असल्याने त्यांना अभ्यासाची अडचण होत आहे. अशा वेळेस सदर अभ्यासिका चालू करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी मा. तहसीलदारांना करण्यात आली.या वेळी स्टुडंट फोरम ग्रुपचे शारीक सय्यद,मारोती डोंगे,अंशुल पोतनूरवार, कृपाल कोल्हे,अक्रम शेख,राकेश सिडाम,भूषण बोबडे,श्रीनिवास परसावर,पवन बुरेवार, लक्ष्मीकांत जाधव, प्रतीक बोरडे उपस्थित होते.

Previous articleधक्कादायक :- अखेर चंद्रपूर जिल्हयातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली शंभराच्या वर !
Next articleखळबळजनक :- ब्रम्हपुरी तालुक्यातून ८ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने उडाली खळबळ !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here