Home भद्रावती रोटरी क्लब भद्रावतीचा 6 वा पदग्रहण सोहळा थाटात सम्पन्न.

रोटरी क्लब भद्रावतीचा 6 वा पदग्रहण सोहळा थाटात सम्पन्न.

 

भद्रावती उपसंपादक :-

रोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3030 च्या नविन वर्षाची सुरुवात 1  जूलै ते 30 जून 2020-21 या वर्षाकारिता होणारा रोटरी महोत्सव _गवर्नर शब्बीर शाकिर आणि असिस्टेंट गवर्नर सचिन गांगरेड्डीवार* यांच्या  मार्गदर्शनात डिस्ट्रिक्ट ऑफिसर विरुभाऊ हझारे आणि अरुण तीखे यांच्या उपस्थितित सरकारचे सर्व *फिजिकल distancing* च्या नियमानुसार थाटात सम्पन्न झाला.

या नवीन वर्षाच्या रोटरी क्लब भद्रावतीचा अध्यक्ष पदाची जिम्मेदारी विनोद कामडी यांनी मावळते अध्यक्ष सुनील पोटदुखे आणि सचिव पदाची जिम्मेदारी प्रवीण महाजन यांनी मावळते सचिव किशोर खंडालकर यांचे कडून स्विकारली. त्याचप्रमाणे नवीन संचालक मंडळ स्थापन केली उपाध्यक्ष सचिन सरपटवार, सहसचिव अब्बास अजानी, कोषाध्यक्ष सुधीर पारोधे, सार्जेन्ट एट आर्म्स डॉ माला प्रेमचंद, पब्लिक इमेज चेअरमन भाविक तेलंग यांची घोषणा केली.
या कार्यक्रमाला विरुभाऊ हजारे, अरुनजी तीखे, सुनील पोटदुखे यांनी मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रवीण केसवानी आणि सचिन सरपटवार यांनी केले,
तसेच *नवीन सदस्य आणि, डॉ केसवानी यांची कन्या खुशी CBSC 10 मधे प्रावीण्य प्राप्त केल्याबदल, तसेच भाविक तेलंग* यांचा सत्कार करण्यात आला.

त्याच प्रमाणे पुढील नवीन सदस्यानी विक्रांत बिसेन, प्रशांत तेलंग, रूपेश ढवस, संजय बोरकुटे यांनी सदस्य म्हणून प्रवेश घेतला.

रोटरी क्लब भद्रावतीद्वारे सकाळी वृक्षारोपण करून पदग्रहण सोहळाची सुरुवात अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतिने करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, युवराज धानोरकर, अविनाश सिद्धमसेट्टीवार, विवेक आकोजवार, तुषार सातपुते, चम्पतराव आस्वाले, प्रकाश पिम्पलकर, आनंद क्षीरसागर, वसंता उमरे, विनोद घोड़े, मदन ताठे, किशोर बावने,ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाउन करण्यात आली.

Previous articleवरोरा शहरातील सर्व प्रभागात फवारणी व फोगिंग चा वापर तात्काळ सुरु करा अन्यथा आंदोलन, छोटू भाई शेख यांचा इशारा,
Next articleखळबळजनक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी बोगस मजूर दाखवून केली लाखोंची उचल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here