Home वरोरा वरोरा शहरातील सर्व प्रभागात फवारणी व फोगिंग चा वापर तात्काळ सुरु करा...

वरोरा शहरातील सर्व प्रभागात फवारणी व फोगिंग चा वापर तात्काळ सुरु करा अन्यथा आंदोलन, छोटू भाई शेख यांचा इशारा,

अध्यक्ष व मुख्य अधिकारी यांना दिले निवेदन,निवेदनाची दखल घेवून अध्यक्षांनी दिले अमलबजावणीचे आदेश.

वरोरा :-

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राखणे आवश्यक असून आता पुन्हा पावसाळा असल्याने आरोग्याच्या द्रुष्टीने शहरातील सर्व प्रभागात फवारणी व फोगिंग चा वापर तात्काळ करून शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे त्यामुळे स्वतः बांधकाम सभापती असताना सुद्धा सामजिक जाण ठेवून छोटूभाई शेख यांनी मुख्याधिकारी व नगरपरिषद अध्यक्ष यांना निवेदन देवून सदर ज्वलंत बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. यावेळी अध्यक्ष अहेतेशाम अली यांनी संबंधित विभागाचे अभियंता व आरोग्य निरीक्षक यांना बोलून सदर विषय तात्काळ मार्गी लावावे अशा सूचना केल्या व आश्वासन सुद्धा दिले. सोबतच अभियंता गेडाम यांनी सदर कामे लवकर सुरू करू असे सांगितले. यावेळी छोटूभाई सार्वजनिक बांधकाम सभापती सामाजिक कार्यकर्ता भारत तेला सह अनेक नगरसेवक कार्यालयात उपस्थित होते.
वरोरा नगर परिषद मार्फत शहरात पावसाळ्याचे दोन महिने लोटून सुद्धा सर्व प्रभागात कीटकनाशक फवारणी झाली नसल्याने कीटकनाशक जंतू.व मच्छर वाढ झाली यामुळे अनेक नागरिक आजारी पडले. शहरातील सर्व प्रभागात पूर्णता कीटकनाशक औषधीची फवारणी न झाल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये डेंगू मलेरिया टायफाईड असे आजार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे यामुळे वरोरा शहरातील सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणात डेंगू टायफाईड मलेरियाची रुग्णात वाढ होऊन अनेक रुग्णालयात त्यांचे उपचार सुरु आहे तरी तीन दिवसाच्या आत वरोरा शहरातील संपूर्ण प्रभागात फवारणी सुरू करण्यात यावी व तसेच आवश्यकतेनुसार फोगिंग.मशीनचा वापर करण्यात यावा आणि खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मलेरिया आईल व इतर औषध टाकण्यात यावे अशी मागणी छोटूभाई यांनी निवेदनात केली आहे. वरील समस्या तीन दिवसाच्या आत सोडवाव्या अन्यथा चौथ्या दिवशी संबंधित विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा छोटूभाई शेख यांनी दिला आहे.
Previous articleधक्कादायक :- एसीसी सिमेंट कंपनी अधिकाऱ्यांचा भ्रष्ट प्रताप झाकण्यासाठी तर कामगारांचा संप नव्हे ना ?
Next articleरोटरी क्लब भद्रावतीचा 6 वा पदग्रहण सोहळा थाटात सम्पन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here