N .R. रोपवन मधे झाली निकृष्ट कामे, कोट्यावधीचा निधी हडपला ?
कुरखेडा प्रतिनिधी :-
कुरखेडा वनपरिक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी अक्षरशः भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा पार करून शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या निधीची अफरातफर केली असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊन त्यांच्याकडून सर्व रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी आता राजकीय पक्षाच्या माध्यमातून होत असून दररोज नवनवे भ्रष्टाचाराचे प्रकरण बघता प्रथमदर्शनी त्यांना निलंबित करून सेवामुक्त करणे आवश्यक आहे असे वनविभागातील तज्ञ सांगत आहे.
सोनटक्के यांच्या भ्रष्ट कामांची मोठी यादीच समोर आली आहे त्यात कुरखेडा वनपरिक्षेत्रात राज्य योजना 2019-20 चा वनीकरणाचा कार्यक्रम घोषित केला होता त्या कार्यक्रमांत रोपवनची कामे 14 लाख 80 हजारा ची झाली त्यापैकी 6 लाख 28 हजार रुपये निधी प्राप्त झाला पण प्रत्यक्षात कामेच झाली नसल्याची माहिती आहे. तर जिल्हा वार्षिक आदिवासी विकास योजनेंतर्गत एकूण 22 लाख पेक्षा जास्त निधी मिळाला असताना त्याची कामे सुद्धा पूर्ण झाली नसताना निधीची उचल करण्यात आली. कैम्पा सन 2019-20 मधे 2262000/- रूपये. राज्य स्तरीय विशेष घटक योजनेत 787600/- केंद्र शासन पुरस्कृत आधुनिक वन नियंत्रण व्यवस्थापन आदिवासी क्षेत्र अंतर्गत 41250/- रुपये. एवढेच नव्हे तर निकृष्ट वनांचे पूर्ण वनीकरण कार्यक्रम अंतर्गत निधी 40000/- अशा प्रकारच्या विविध योजनेत मिळालेल्या निधीचा अपहार करून निकृष्ट दर्जाचे कामे व बोगस मजूर दाखवून त्यांच्या मजुरीची रक्कम हडप करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी करून कुरखेडा वनपरिक्षेत्रात मोठा भ्रष्टाचार करून कोट्यावधीची अफरातफर केल्याने आता त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल व्हायला हवे अशी मागनी जोर पकडू लागली आहे.