Home गडचिरोली सनसनिखेज:- भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या सेट्टिंगची पोल खुलली ?

सनसनिखेज:- भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या सेट्टिंगची पोल खुलली ?

मुख्य वन संरक्षक यांच्या संभावित बदलीमुळे सोनटक्के यांनी रोखली रसद आता नवीन मुख्य वन संरक्षक यांच्या सोबत होणार नवीन करार ?

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यानी आपल्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याने त्यांची विभागीय चौकशी लागली मात्र चौकशी अहवाल हा मुख्य वन संरक्षक यांच्याकडे जातो व त्यानंतरच कारवाई होते हा नियम आहे आणि म्हणूनच मुख्य वन संरक्षक रामाराव यांची संभावित बदली लक्षात घेता सोनटक्के यांनी विभागीय चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मैनेज करून नवीन मुख्य वन संरक्षक यांच्याकडे जर चौकशी अहवाल सुपूर्द केल्यास आपले तत्कालीन मुख्य वन संरक्षक यांना मैनेज करण्यासाठी जी रक्कम खर्च होणार ती रक्कम वाचवीण्याचा प्रयत्न केल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे सोनटक्के यांच्या सेट्टिंग ची पोलखोल झाली आहे, खरं तर वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांची विभागीय चौकशी ही जर पूर्णतः मैनेज झाली असेल तर विभागीय चौकशी अधिकारीच गोत्यात येणार अशी शक्यता आहे मात्र “तरीही मरता क्या नही करता” ह्या उक्ती प्रमाणे सोनटक्के यांची पैसे वाचवीण्याची आणि अब्रू वाचवीण्याची सर्कस सुरू केली असून आता चक्क नवीन मुख्य वन संरक्षक अधिकारी प्रवीण यांच्या सोबत सेट्टिंग करण्यासाठी मागील पंधरा दिवस विभागीय चौकशी अहवाल हा सुरक्षित ठेवण्यात सोनटक्के यांनी यश मिळविले असल्याची बाब आता स्पष्ट होत आहे. मात्र तरीही आता जुन्या अधिकाऱ्यांना ज्या तक्रारी देण्यात आल्या त्या तक्रारी पुन्हा नवीन अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याने पुन्हा सोनटक्के यांची स्वतःचा बचाव करण्यासाठी धावाधाव सुरू राहणार एवढी गोष्ट स्पष्ट  दिसत आहे. सोनटक्के हा अधिकारी एवढा चतुर आणि सेट्टिंगबाज आहे की तो कुठल्याही स्तरांवर जावू शकतो त्यामुळे आता त्यांच्या निलंबनाची मागणी पुनः  जोर धरणार आहे तर दुसरीकडे त्यांच्या संपूर्ण चल अचल संपत्तीची चौकशी करण्याची मागणी होत असल्याने पुन्हा ते गोत्यात येईल असेच एकूण चित्र दिसत आहे ….

Previous articleधक्कादायक :- संजय लेडांगेने आपल्या पत्नीची हत्त्या करून विहिरीत टाकले प्रेत सासू सुलभा जिवतोडेचा आरोप !
Next articleक्राईम स्टोरी :- टेमुर्डा खांबाडा शेगाव परिसरात दारू माफियांचा धुमाकूळ ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here