Home वरोरा क्राईम स्टोरी :- टेमुर्डा खांबाडा शेगाव परिसरात दारू माफियांचा धुमाकूळ ?

क्राईम स्टोरी :- टेमुर्डा खांबाडा शेगाव परिसरात दारू माफियांचा धुमाकूळ ?

अंजु अण्णा, विनोद सोयाम, गजू शेंडे, केतन सोनुने या दारू माफीयांना पोलिसांचा अभय ?

वरोरा  प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात सध्या अंजु अण्णा, विनोद सोयाम, गजू शेंडे, केतन सोनुने हे दारू माफिया टेमुर्डा, खांबाडा शेगाव परिसरात दररोज लाखो रुपयाची देशी विदेशी दारू खुलेआम बेकायदेशीरपणे विकत असून
वणी येथील सोनू जयस्वाल यांच्या माध्यमातून या दारू माफिया कडे अवैध दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे।या संदर्भात अधिक माहिती घेतली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ता जात असल्याने यांच्या अवैध दारू व्यवसायाला मोठे पाठबळ मिळत आहे. मात्र येणाऱ्या समोरच्या काळात पोळा आणि गणेश उत्सव असल्याने ह्या दारू माफियावर वेळीच पायबंद घातल्या न गेल्यास मोठ्या एखाद्या घटनेला सामोरे जाण्याची शक्यता बळावली असून पोलिस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी सर्कस करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here