Home Breaking News नागपूर जिल्हा तैलिक समाज महिला आघाडीच्या संघटक पदी कविता रेवतकर यांची नियुक्ती...

नागपूर जिल्हा तैलिक समाज महिला आघाडीच्या संघटक पदी कविता रेवतकर यांची नियुक्ती ! अनेकांनी केला त्यांचेवर अभिनंदनचा वर्षाव!नागपूर विशेष प्रतिनिधी
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा या सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या नागपूर जिल्हा संघटक पदी कविता दिपकजी रेवतकर यांची नुकतीच निवड झाली आहे. त्या मुळच्या शक्ती माता नगर नागपूर येथील रहिवाशी असुन सामाजिक कार्यात आज पावेताे त्यांचे योगदान माेलाचे ठरले आहे. इतकेच नाही तर त्या एक जागृत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या महिला कार्यकर्त्यां आहेत
प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांनी नेहमीच अंगिकारली आहे.कुठल्याही समाजांच्या अडीअडचणीत त्या स्वतः धावून जातात हे विशेष ! दरम्यान कविता रेवतकर यांचे नियुक्तीचे स्वागत विदर्भातील अनेक समाज बांधवानी केले असुन विजय हटवार , संगीता तलमले ,अजय धाेपटे , हितेश बावनकुळे , रुपेश तेलमासरे , मंगेश कामडी , अंकुश येळणे , महेन्द्र भूरे , राजेश राजगिरे , मंगेश साखरकर , प्रमाेद उमाटे , परेश भनारे , रमेश वंजारी , सुभाष वाघमारे , नंदु धाेपटे , शाेभा जयपुरे यांनी एका संयुक्तिक पत्रकातुन त्यांचे निवडीचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here