Home कोरपणा स्टुडंटफोरम ग्रुप कोरपना व माथा तर्फे पोलिस भर्ती सरावासाठी तालुका मैदानाची स्वयंप्रेरणेने...

स्टुडंटफोरम ग्रुप कोरपना व माथा तर्फे पोलिस भर्ती सरावासाठी तालुका मैदानाची स्वयंप्रेरणेने स्वच्छता

 

प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी
कोरपना येथील तालुका मैदानाची स्वच्छता स्टुडंट फोरम ग्रुप तर्फे करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत लवकरच मोठी पोलिस भरती करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसारित केली जात आहे. त्याच अनुषंगाने स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना व माथा तर्फे पोलिस भरती ची तयारी करणाऱ्या मुलांना सराव करणे सोपे जावे या दृष्टीने सदर मैदानाची साफ सफाई गवत कापून व फवारणी करून करण्यात आली. स्टुडंट फोरम ग्रुप तर्फे काही दिवसात याच मैदानात मैदानी सरावाचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच लेखी परीक्षेकरिता सुद्धा तज्ञशिक्षकांचे मार्गदर्शन शिबिर सुरू केले जाणार आहे. तालुक्यातील सर्व पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन ग्रुप चे अतुल जोंजाळ, अभिषेक तूराणकर, मारोती डोंगे, दिलीप जाधव, अक्रम शेख, प्रफुल्ल कातरकर, कृपाल कोल्हे, विशाल भोयर, नावेद पठाण, कृष्णा बोधे, प्रणित माजरे, शारिक सय्यद, प्रज्योत आवारी, दिनेश ढेंगळे, महेश देरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here