Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट:- शिरपूर पोलिस स्टेशन बनले दारू तस्करांचे संरक्षक?

क्राईम ब्लास्ट:- शिरपूर पोलिस स्टेशन बनले दारू तस्करांचे संरक्षक?

 

अवैध दारू विक्रीमधे कैलास नगर मधील नागराज करपका, श्रीनिवास बलगणीवार कलवल, भालर मधील राजू पेले यांच्यासह लड्डम भराडी, दादू भराडी, दादू वर्मा, शेखर तालापेल्ली, सचिन ठाकरे,अमित पाटील, सिनु रामटेके, राजेश मोरपका बेंद्रे इत्यादीची शिरपूर पोलिस स्टेशन मधे पोलिसांशी साठगांठ.

दारूकट्टा भाग – ३

वणी तालुक्यातील अधिकृत देशी दारू बियर बार व वाईन शॉपी मधून घूग्गूस मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक ही शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्या संरक्षणात होत असून महिन्याकाठी जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम ह्या ठाण्यात अवैध दारू विक्रीत सामील नागराज करपका, श्रीनिवास बालगनीवार, सिनु कलवल, भालर मधील राजू पेले यांच्यासह लड्डम भराडी, दादू भराडी, दादू वर्मा, शेखर तालापेल्ली, सचिन ठाकरे,अमित पाटील, सिनु रामटेके, राजेश मोरपका बेंद्रे

इत्यादीच्या माध्यमातून मिळत असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे, विशेष म्हणजे वणी तालुक्यातील देशी दारू दुकाने वाईन शॉपी व बियर बार येथून दारू पुरवठा झाल्यानंतर व त्यातील दारू पोलिसांनी पकडल्या नंतर आरोपीने कुठून दारू आणली याची माहिती पोलिसांना मिळाली असली तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशनचे ठाणेदार जिथून दारू आली त्या देशी विदेशी दारू दुकाने व बियर बार मालकांवर कारवाई का करीत नाही हा प्रश्न अतिशय गंभीर असून नुकताच पडोली पोलिसांनी सुद्धा भालर येथील देशी दुकानातून राजू पेले उर्फ राजू अन्ना यांच्या कडून दारू आणल्या ची कबुली दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही नव्हे गुन्ह्यात नाव असताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून राजू पेले यांना अटक करण्यात आली नाही त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या संरक्षणात मोठे दारू तस्कर हे रातोरात दारूचा मोठा साठा शिरपूर पोलिस स्टेशन च्या संरक्षणात चंद्रपूर जिल्ह्यात आणल्या जातो, या धंद्यात दररोज कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असून पोलिस स्टेशन च्या प्रत्त्येक ठाणेदार व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना महिन्याकाठी लाखो रुपयांचे पैकेज जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

आता चोर मार्गाने कोण? कशी ?कुठून ? किती ? दारू चंद्रपूर जिल्ह्यात पुरवठा करते त्याचा लेखाजोखा वाचा येणाऱ्या अंकात …..

Previous articleआबीद अली च्या. राष्ट्रवादी प्रवेशाने कार्यकत्‍यात उत्साह भाजप मध्ये खिंडार၊
Next articleलक्षवेधी :- पालकमंत्री साहेब, जनता कर्फ्यू नक्की करा, पण जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक संकटाला पण घालवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here