Home वरोरा पोलिस डायरी :- विष्णू कष्टीचा खून करणाऱ्या शंभू चौधरीला पाठबळ कुणाचे ?...

पोलिस डायरी :- विष्णू कष्टीचा खून करणाऱ्या शंभू चौधरीला पाठबळ कुणाचे ? पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह ?

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विष्णू कष्टी प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी,

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील खांबाडा परिसरात मागील अनेक वर्षापासून गिट्टि क्रशर खदान मधे ब्लास्टिंगची मोठी कामे करणारा राजस्थानी शंभू चौधरी हा गुंडगिरी करतो व दुसऱ्या व्यक्तींना या कामात येऊ देत नाही. तो आपले अवैध कामे करून स्थानिक पोलिस पाटील, सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व इतर राजकीय नेत्यासोबत पोलिसांशी त्याचे घनिष्ठ सबंध आहे व पोलिस अधिकाऱ्यांना तो आपल्या वाड्यावर ओल्या पार्ट्या देत असल्याची पण चर्चा आहे,

शंभू चौधरी यांच्याकडे विष्णू कष्टी ड्रायवर म्हणून नौकरी करायचा, अर्थात विष्णू हा शंभू चौधरीच्या राजस्थान येथील घरी पण त्याच्या सोबत जायचा त्यामुळे विष्णू कष्टीवर विश्वास असल्याने त्याच्या नावाने लायसन्स काढून काही काम शंभू चौधरी करायचा अशी चर्चा आहे, दोघांमध्ये चांगला आपसी समन्वय होता पण मागील काही दिवसापासून दोघांमध्ये खटके उडत असल्याची माहिती सुद्धा आहे. अर्थात शंभू चौधरी याचे सर्व गोपनीय राज हे विष्णू कष्टी ला माहित होते त्यामुळे विष्णूने बाहेर काही गोष्टी सांगू नये म्हणून शंभू चौधरीने विष्णू वर कायमचा दबाव बनवला होता, मात्र विष्णू हा काही दिवसापासून शंभू ला मानायचा नाही, त्यामुळेच आता विष्णू ने आपले राज खौलले तर आपली दुकानदारी बंद होईल म्हणून विष्णुला कायमचा हटविण्यासाठी शंभू चौधरी ने त्याच्याकडेच काम करणाऱ्या दोघा कामगारांसोबत मिळून विष्णू कष्टीची 7 सप्टेंबरला हत्त्या करून म्रूतदेह त्याच्याच वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या झुडपात टाकला व तिथून पळ काढला.मात्र पोलिसांनी याचा शोध लावायचा आतच खांबाडा येथील विष्णुचे भाऊ व इतरांनी दोन आरोपी ला पकडले व पोलिसांच्या हवाली केले,

विष्णू कष्टीची हत्त्या केल्यानंतर व शंभू चौधरी हा मुख्य आरोपी असल्याची पोलिस तक्रार असताना व त्याचेवर कलम 302 कलमान्वये गुन्हा दाखल असताना पोलिस त्याला अटक का करीत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न असून पोलिसांना शंभू चौधरी यांनी चुप केले की एका राजकीय नेत्यानी पोलिसांवर दबाव टाकून शंभू चौधरी याला अटक करू नये म्हणून चुप केले ? हे राज अजूनपर्यंत समोर आले नाही, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन परप्रांतीय शंभू चौधरी याला त्वरित अटक करून त्याचे स्फोटक असलेले गोडाऊन सील करण्याची मागणी केली होती पण सगळी पोलिस यंत्रणांच शंभू चौधरी यांनी जणू विकत घेतली असल्याने तो खुलेआम फिरत आहे तर स्थानिक राजकारणी हातांवर हात धरून परप्रांतीय राजस्थानी यांनी स्थानिक मराठी माणसाची केलेली हत्या निमूटपणे सहन करीत असल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्टाद्वारे निवेदन पाठवून विष्णू कष्टी हत्त्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी व त्याच्या सर्व स्फोटक भरलेले गोडाऊनला सील ठोकून ते जप्त करावे अन्यथा आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा दिला आहे. मात्र तत्काळ या प्रकरणात नवीन पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here