Home वरोरा पिंटूच्या दारू तस्करीत प्रभाकरचा साथ….मग साहेब कसा आवळेल त्याचेवर कारवाईचा फास ?

पिंटूच्या दारू तस्करीत प्रभाकरचा साथ….मग साहेब कसा आवळेल त्याचेवर कारवाईचा फास ?

 

चंद्रपूर एलसीबीचा पिंटूवर दुसरा छापा मात्र वरोरा पोलिसांची पिंटूवर ही कसली क्रुपा?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे आणि त्या धंद्यात पोलिसांचे असलेले पाठबळ यामुळे एकीकडे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही तर दुसरीकडे अवैध व्यवसायी व गुंडागिरी करणारे यांची मुजोरी वाढली आहे. खांबाडा येथील अवैध स्फोटक धंद्यात लिप्त असलेल्या शंभू चौधरी ने विष्णू कष्टी या तरुणांची हत्त्या केल्यानंतर सुद्धा पोलिसांना तो आरोपी असल्याचे शीद्ध करता येत नाही कारण शंभू हा पोलिसांनाच आपल्या बंड्यावर ओल्या पार्ट्या देत असल्याची चर्चा आहे. अर्थातच मग अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलिस सरक्षण देत नसेल हे कशावरून ? त्यांमुळे वरोरा पोलिस स्टेशन हे अवैध धंदे करणाऱ्यांचे जणू शक्तीस्थळ बनले असल्याची चर्चा आहे.

काही दिवसापूर्वी मुखबिरच्या खबरी नुसार एलसीबीच्या पथकाने नाकाबंदी केली असता मॅस्ट्रो क्र MH 34 BC 4320 या गाडीला थांबविले असता मोपेड चालक व मागे बसलेला इसम पळुन गेले प्रोव्हीबाबत सदर मोपेडची झडती घेतली असता गाडीचे पायदान वर पाच खरड्याचे बॉक्स मधे देशी दारुने भरलेल्या एकुन 500 नग देशी दारुच्या निपा किंमत 50,000/-रु व गाडी किंमत60,000/- रु असा एकुन 1,10,000/- रु चा मुद्देमाल मिळून आला. या गाडीसह मुद्देमाल वरोरा पोलिस स्टेशन मधे पुढील चौकशी करिता जमा करण्यात आला.पण अजून पर्यंत पिंटू याची गाडी असल्याची खात्रीलायक माहिती असताना सुद्धा वरोरा पोलीसानी आरोपीला पकडले नाही आश्चर्याची बाब म्हणजे केवळ पाच देशी दारूच्या पेट्या असलेल्या गुन्ह्याचा तपास स्वतः ठाणेदार करताहेत म्हणजे काय ? हेच कळत नसून पिंटूच्या दारू तस्करीत प्रभाकरचा साथ असल्याने साहेबांचा आरोपी पर्यंत हात पोहचत नसल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच पिंटू वर कारवाईचा फास आवळल्या जात नसल्याचे पण बोलल्या जात आहे. दखल घेण्यासारखी ही बाब आहे की चंद्रपूर वरून वरोरा येथे येणाऱ्या एलसीबी पथकाला वरोऱ्यातील अवैध दारू तस्कर सापडतात मग वरोऱ्यात नेहमीच गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना असले दारू तस्कर सापडत नसेल का ? याचे आश्चर्य वाटते. आता त्या पाच देशी दारूच्या पेट्या संदर्भात पिंटूला अटक होते की शंभू सारखे त्याला पण अभय दिल्या जाते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here