Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूरातील त्या “जम्बो कोविड हॉस्पिटल” ला मनपा बांधकाम व आरोग्य...

धक्कादायक :- चंद्रपूरातील त्या “जम्बो कोविड हॉस्पिटल” ला मनपा बांधकाम व आरोग्य विभागाची परवानगी नाही ?

 

आयुक्तांनी (Pandemic act) पेन्डिमिक कायदा वापरून दुरुपयोग केला का?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – १९

 

चंद्रपूर महानगर पालिकेत सत्ताधारी यांनी अंदाधुंद भ्रष्ट कारभार चालवून शहरातील जनतेला वेठीस धरले असल्याची बाब आता उघड होत असून वाट्टेल त्या व्यक्तीच्या बांधकामाला परवानगी व वाट्टेल तेंव्हा एखाद्या व्यक्तीचे घर पाडण्याची जबरदस्ती सुरू आहे, यामधे आयुक्त राजेश मोहिते हे जणू सत्ताधाऱ्यांचे रबरस्टैम्प बनले की काय ? अशीच परिस्थिती चंद्रपूर मनपा मधे दिसत आहे.

एकीकडे शंकूतला लॉन येथे खाजगी जम्बो कोविड हॉस्पिटलची निर्मिती करिता डॉ. अनुप वासाडे यांना सत्ताधाऱ्यांनी समोर करून मनपा आयुक्त यांना खाजगी जम्बो कोविड हॉस्पिटल निर्मिती करिता मंजुरी देण्यासाठी दबाव बनविला आहे तर दुसरीकडे मनपा आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन दिनांक १५ सप्टेंबरच्या डॉ. अनुप वासाडे यांच्या अर्जावरुन त्याच १५ सप्टेंबरला चंद्रपूर मनपा आयुक्तांनी (Pandemic act)पेन्डिमिक कायदा वापरून हॉस्पिटलच्या जागे बद्दल कुठलीही चौकशी न करता ६ महिन्याची तात्पुरती मंजुरी देतात मात्र या संदर्भात अधिक माहिती घेतली असता मनपा बांधकाम व नगररचना विभाग जो बांधकाम परवानगी देतो त्यांनी ती मंजुरी दिली नाही तर दुसरीकडे मनपा आरोग्य विभागाची सुद्धा परवानगी नाही, मग ज्या जागेचा वाद न्यायालयात आरक्षण हटविण्यासाठी सुरू आहे आणि त्या जागेचे मालक अमोल पत्तीवार हे सदर जागेचा वापर शेतीसाठी करीत असल्याचे सांगतात व दुसरीकडे मनपा कार्यालयातून सदर जागेचा वापर वाणिज्य वापरासाठी होत असल्याचे म्हटले आहे. शिवाय सन २०१५ पासून या जागेचा परवाना नूतनीकरण केला नसून टँक्स सुद्धा भरला नसल्याचे सांगतात त्यामुळे जी जागा विवादित आहे व त्यातील आरक्षण अजून पर्यंत हटले नाही त्या जागेवर जम्बो कोविड हॉस्पिटल ची निर्मिती करण्याचा हट्ट का ? आपल्या शहरात चांदा क्लब ग्राउंड आहे. न्यू इंग्लिश शाळेचे ग्राउंड आहे. जिल्हा स्टेडियमचे ग्राउंड आहे एवढेच नव्हे तर वन अकादमी ची जागा आहे त्या जागेवर सर्व व्यापारी उद्धोगपती व राजकारणी लोकप्रतिनिधी मिळून जम्बो कोविड हॉस्पिटल का उभारल्या जात नाही ? त्यामधे किमान जागेचा टैक्स वाचेल व सरकारी यंत्रणा सुद्धा सामील झाल्यास सरकारी मदत मिळाल्यामुळे कोविड रुग्णांना स्वस्तात उपचार मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here