Home वरोरा धक्कादायक :- अस्थी विसर्जन करण्यास गेलेल्या २९ वर्षीय तरुणांचा तलावात बुडून मृत्यू.

धक्कादायक :- अस्थी विसर्जन करण्यास गेलेल्या २९ वर्षीय तरुणांचा तलावात बुडून मृत्यू.

 

तलावातील खोदकाम झाल्याने पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे गेला बळी, मोवाडा गावात शोककळा.

किशोर डुकरे ता. प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील मोवाडा येथील तलावात पिंपळगाव येथील अनंता पांडुरंग वैद्य वय २९ वर्ष हा युवक आपल्या नातेवाईक असलेल्या पिंपळगाव येथील तुकाराम जिवतोडे यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी मोवाडा येथील तलावात गेले असता त्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

येथूनच जवळ असलेल्या पिपळगाव (मा )येथील रहिवाशी अनंता पांडुरंग वैद्य वय29वर्ष हा आपल्याच गावातील तुकाराम जिवतोडे यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी मोवाडा तलाव येथे आला असता तलावाचे मातीकाम करण्यासाठी खोदलेल्या जागेचा अंदाज न लागल्यामुळे त्याचा तोल खोल पाण्यात जाऊन बुडून मृत्यू झाला त्याचा मागे, पत्नी, 4 वर्षाची मुलगी, दीड वर्षाचा मुलगा, आई वडील अशा बराच आप्त परिवार असून त्याचे प्रेत उत्तरणीय तपासणी साठी वरोरा येथील उप जिल्हा रुग्णालय येथे पाठवून पुढील तपास शेगाव पुलिस स्टेशन येथील ठाणेदार सुधीर बोरकुटे हे पुढील करीत आहे

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूरातील त्या “जम्बो कोविड हॉस्पिटल” ला मनपा बांधकाम व आरोग्य विभागाची परवानगी नाही ?
Next articleचिंताजनक :- पुन्हा 24 तासात आणखी 233 कोरोनाबाधित आले समोर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here